मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आघाडी उघणाऱ्या भाजपच्या महिला उपाध्यक्षा () अडचणीत आल्या आहेत. चित्रा वाघ यांचे पती यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा नोंदवला आहे. बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (ACB Booked In Disproportionate Assets Case)

वाचा:

परळ येथील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्या विरोधात तक्रार आहे. त्या प्रकरणाचा तपास सुरू होता. तपासात किशोर वाघ यांच्या विरोधात काही माहिती मिळाल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडं असलेल्या ९० टक्के मालमत्तेचा हिशोब नाही, असं एसीबीचं म्हणणं आहे.

चित्रा वाघ म्हणतात…

‘पूर्णपणे सूडबुद्धीनं माझ्या पतीच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. मला आणि माझ्या पतीला याबाबत कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी मी तयार आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

वाचा:

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्य सरकारला प्रश्न विचारणं चित्रा वाघ यांनी सुरूच ठेवलं आहे. नाशिक येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. ‘वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात पुरावे असताना सरकार का कारवाई करत नाही? अजूनही FIR का नाही? त्या मोबाईलमधील ऑडिओ क्लिपचं काय झालं? यात असलेला डेटा कुठे गेला? बलात्कारी आणि खुन्याला का वाचवताय?,’ असं प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here