नवी दिल्ली : वाढत्या करोना संक्रमणा दरम्यान विमानन नियामक नागरी उड्डाण संचलनालयानं () आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर घातलेली बंदी ३१ मार्चपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियाद्वारे डीजीसीएनं यासंबंधी माहिती दिलीय.

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी २३ मार्चपासून संचालन स्थगित करण्यात आलंय. ही बंदी २८ फेब्रुवारीपर्यंत लागू करण्यात आली होती. परंतु, पुन्हा एकदा करोना रुग्णांच्या आकड्यात होत असलेली वाढ लक्षात घेता ही बंदी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आलीय.

डीजीसीएकडून शुक्रवारी सायंकाळी उशिरा याबाबत दिशा-निर्देश जारी करण्यात आलेत. भारतातून परदेशात जाणारी किंवा परदेशातून भारतात येणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणं २०२१ पर्यंत रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याचं यात म्हटलं गेलंय.

विशेष परिस्थितीत काही निवडक मार्गांवर उड्डाणांची परवानगी दिली जाऊ शकते, असंही डीजीसीएकडून स्पष्ट करण्यात आलंय.

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर नियंत्रण आणण्यात आलं. बदलत्या परिस्थितीनुसार अनेकदा यात बदल करण्यात आले आहेत. देशांतर्गत उड्डाणांना परववानगी देण्यात आली असली तरी त्यांची संख्या मात्र कमी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here