चित्रा वाघ या नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग माझ्या नवऱ्याचा छळ करत आहे. मी मुंबई बँकेतून कधीही कर्ज घेतलेले नाही आणि असे असतानाही की बँकेला ३० लाख रुपयांच्या कर्जाची माहिती द्या, असे सांगत मी या विरुद्ध न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. देशातील न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असून ती सरकारसारखी मुर्दाड नाही असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
किशोर वाघ हे केवळ चित्रा वाघ हिचे पती असल्यामुळेच सरकार हे करत आहे. सरकार त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतेय. आमच्यावर हल्ले करतेय. मात्र मी गप्प बसणार नाही. पूजा चव्हाण सारख्या पीडितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मी आवाज उठवतच राहणार, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
9146870100 हा नंबर कोणाचा ?
9146870100 हा नंबर कोणाचा आहे, हे सांगणार की नाही?, असा सवालही त्यांनी विचारला. या मोबाइल नंबरचा CDR काढा, असे आव्हानही त्यांनी दिले. आपल्याला पोलिसांचा अभिमान असून मूठभर पोलीस बदनाम करत आहेत. राज्यातील प्रत्येक पीडितेचे प्रश्न गंभीर आहेत आणि राजकारण करण्यासाठी याचं गांभीर्य नाही. धनंजय मुंडे प्रकरणात तक्रारदार महिला मागे फिरली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करा ही आमची मागणी कायम आहे, असे चित्रा वाघ पुढे म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
केवळ इतर पक्षांचाच नाही तर, भाजपचा देखील कोणी चुकला तर त्यालाही सोडणार नाही. महिला हा विषय भाजपसाठी राजकारणाचा विषय नाही, असेही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांवर दबाव?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव असल्याच्या बातम्या मी वाचल्या. हे जर खरे असेल तर ते क्लेषदायक असल्याचे वाघ म्हणाल्या. पूजा चव्हाणला न्याय मिळावा हेच आम्हाला वाटतं, असे सांगत संजय राठोड यांच्या मुसक्या बांधाव्या असं पूजा चव्हाणच्या आईवडींलांना वाटत नाही का?, असा सवालही त्यांनी केला. पूजा चव्हाण यांच्या आईवडिलांनी पोलिसांना याचा जाब विचारला. पूजा ही महाराष्ट्राची लेक आहे. तिची बदनामी करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्या म्हणाल्या.
100 या पोलीस नंबरवर अरुण राठोडने जबाब दिला त्याचं काय झालं ? हे तुम्ही का विचारत का नाही ? हा प्रश्न तिच्या वडिलांना मला विचारायचाय, असे ही त्या म्हणाल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times