मुंबई: राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दी टाळणं आणि मास्कचा वापर करणं हाच करोनापासून दूर राहण्याचा उत्तम उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मनसे अध्यक्ष मास्क न घालताच आज मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल विचारलं असता त्यांनी अजब उत्तर दिलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. महापालिका प्रशासन राज ठाकरे यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. ( Said, I Don’t Use FaceMask)

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेनं शाखा-शाखांवर ‘मराठीतून स्वाक्षरी’ कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यापैकी एका कार्यक्रमात राज ठाकरे स्वत: सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी लावले नव्हते. याबद्दल पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर, मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो,’ असं ते म्हणाले. राज यांच्या या वक्तव्यामुळं चर्चा रंगली आहे.

वाचा:

‘मनसेच्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारमधले मंत्री गर्दी करून धुडगूस घालतात, ते चालते. पण, शिवजयंती आणि मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना नकार दिला जातो. एवढी काळजी वाटत असेल तर सर्व निवडणुका एक वर्ष पुढं ढकला. एका वर्षाने घ्या. काही फरक पडत नाही,’ असं त्यांनी सुनावलं.

‘अभिजात भाषेचं संभाजीनगरसारखं व्हायला नको’

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं सरकारच्या मनात आहे की नाही? हेच कळत नाही. की यांना फक्त संभाजीनगरसारखं करायचं आहे. हा दिवस आल्यानंतरच सरकारला जाग का येते? त्यांना असं का बोलावसं वाटतं? सरकारला तुम्ही या गोष्टी विचारायला हव्यात,’ असं राज ठाकरे म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here