मुंबई: ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मिस्टर सत्यवादी आहेत. अत्यंत जागरूक व न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत,’ असा दावा शिवसेनेचे खासदार यांनी प्रकरणाबाबत बोलताना केला आहे. ( MP Sanjay Raut Praises )

पूजा चव्हाण प्रकरणात () वनमंत्री () यांचं नाव आल्यापासून भाजपनं सरकारविरोधात रान उठवलं आहे. राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यात आघाडीवर आहेत. आजही भाजपनं ठिकठिकाणी राठोड यांच्याविरोधात निदर्शनं केली. या संपूर्ण घडामोडींविषयी संजय राऊत यांना विचारलं असता, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

वाचा:

‘राज्याचे मुख्यमंत्री शांत नाहीत. ते कुठल्याही गोष्टीपासून अनभिज्ञ नाहीत. जे जे घडतंय, ते सर्व त्यांना माहीत आहे. त्यांचं प्रत्येक घडामोडींकडं लक्ष आहे. अत्यंत जागरूक मुख्यमंत्री आहेत. संवेदनशील आहेत. तपास पूर्ण होऊ द्या, मग बोलू एवढीच आमची भूमिका आहे,’ असं राऊत म्हणाले.

वाचा:

‘चित्रा वाघ यांची काही वक्तव्ये मी ऐकली आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. विरोधी पक्षाचे लोक काहीही बोलू शकतात. महाराष्ट्रात विरोधकांना बोलण्याचं लायसन्स आहे. चित्रा वाघ यांच्याकडं सरकार आणि पोलिसांपेक्षा अधिक माहिती असू शकते. तशी ती असेल तर त्यांनी जाहीर आरोप करण्याऐवजी तपास यंत्रणेला भेटून दिली पाहिजे. गृहमंत्र्यांची भेट घेतली पाहिजे. तपासात त्याचा उपयोग होऊ शकतो. केवळ प्रसिद्धीसाठी किंवा राजकारणासाठी याचा उपयोग करू नये. न्याय न मिळाल्यास इतर माध्यमांचा वापर त्यांनी जरूर करावा,’ असं संजय राऊत म्हणाले.

वाचा:

‘महाराष्ट्रातील विरोधी पक्षानं पूजा चव्हाण प्रकरणात अधिवेशनात नक्की बोलावं, पण अधिवेशन होऊ देणार नाही, अशी धमकी देणं म्हणजे त्यांचा अजेंडा ठरलेला आहे. अनेक प्रश्न आहेत. विरोधी पक्षानं ते मांडायला हवेत. पेट्रोल, डिझेलच्या महागाईचा प्रश्नही त्यांनी मांडायला हवा. पेट्रोल, डिझेलविरोधात विरोधकांनी आंदोलन केलं तर आम्ही स्वत: त्यात सहभागी होऊ,’ असंही राऊत म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here