नाशिक: ‘पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते’, असे म्हणत आपले पती किशोर वाघ हे निर्दोष असल्याचे भाजप नेत्या यांनी म्हटले आहे. ५ जुलै २०१७ ला माझ्या पतीवर गुन्हा दाखल झाला आणि ईदीच्या दिवशी ७ जुलैला यांनी बोलावलं. माझ्याकडे पंचनाम्याची, एफआयआरची कॉपी मागितली. ती पाहिली आणि त्यांनी सांगितले की, चित्रा, तुझा नवरा यात कुठेच नाही, असे सांगत खुद्द शरद पवार यांनी माझा पती निर्दोष असल्याचे सांगितल्याचे अप्रत्यक्षपणे नमूद केले.

चित्रा वाघ नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे प्रहार केले. ‘ते प्रकरण अजूनही कोर्टात सुरू आहे. मला महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायचे आहे की, माझ्या नवऱ्याने एक रुपयाही घेतलेला नाही. तो त्या ठिकाणी नव्हताच. कृपया माझ्या नवऱ्याला कळू द्या की माझ्या नवऱ्याने पैसे घेतले की नाहीत’, असे चित्रा वाघ पुढे म्हणाल्या.

आता हे सरकार आले. २०११ पासूनच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कितीतरी प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत हे मी जबाबदारीने सांगते, अजूनही कोणावर केस दाखल झालेली नाही असे चित्रा वाघ म्हणाल्या. या प्रकरणात असलेला मुख्य आरोपी गांधी हॉस्पिटलचा सुपरिटेंडेंट डॉ. गजानन भगत याची अजून चौकशीच सुरू आहे आणि माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करत आहेत, वा रे वा… वा गृहमंत्री, तुम्हाला तर तिनदा सॅल्युट… असे म्हणत त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही टोला हाणला.

क्लिक करा आणि वाचा-

महाविकास आघाडी सरकारवर प्रहार

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचे पती
यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. किशोर वाघ यांनी बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. लाचलुचपच प्रतिबंधक विभाग माझ्या नवऱ्याचा छळ करत असल्याचा आरोप करतानाच मीच तुम्हाला पुरून उरेन असे आव्हानही चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here