अहमदनगर: रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही? सरकार त्याला पाठीशी घालतेय काय? असे प्रश्न उपस्थित करीत जरे यांचा मुलगा रुणाल यांनी पाच मार्चपासून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी मोठे कारस्थान सुरू असल्याचा संशयही जरे यांनी व्यक्त केला असून एकप्रकारे हे यंत्रणेला दिलेले आव्हान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

वाचा:

या प्रकरणात पोलिसांनी नुकतेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. मात्र, सूत्रधार अद्याप फरार आहे. यासंबंधी जरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपल्या आईच्या म्हणजे रेखा जरे यांच्या हत्येला ८७ दिवस उलटून गेले आहेत. तरीही यातील मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडलेला नाही. एवढे सक्षम अधिकारी असतानाही आरोपी सापडत नाही. त्यामुळे सरकार त्याला पाठीशी घालत आहे, असे वाटते. त्यामुळे पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय करते? हे प्रकरण दडपण्याचा तर प्रयत्न सुरू नाही ना? यात कोणी तरी लपवाछपवी तर करीत नाही ना, असे प्रश्न पडले आहेत. मी व माझे वडील पोलिसांना मदत करायला सतत तयार आहोत. यासाठी आम्ही अधिकारी आणि मंत्र्यांनाही भेटलो. मात्र, माझ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडूनही मिळू शकली नाहीत. त्यामुळेच मोठे कट कारस्थान करून या गुन्ह्याची चौकशी दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. हिमत असेल तर चौकशी करून दाखवा, अशा प्रकाराचा संदेशच जणून यातून दिला जात आहे.

वाचा:

पोलिसांवर मोठा राजकीय दबाव असल्यासारखे वाटत आहे. शिवाय मंत्रीही स्वत: यावर बोलत नाहीत. देशात नावाजलेल्या महाराष्ट्र पोलिसांना हा आरोपी सापडत नाही, यामागे नेमके कारण काय? यामागे कोण आहे? आम्ही एवढा पाठपुरावा करूनही आम्हाला नेमकी उत्तरे मिळालेली नाहीत. माझी आई राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी असली तरी शेवटी ती एक स्त्री होती. त्या दृष्टीने या प्रकरणाकडे पाहिले पाहिजे. पोलिसांवर आमचा विश्वास होता. मात्र, दोषारोपपत्र दाखल झाले तरीही मुख्य आरोपी सापडत नाही. त्यामुळे आरोपीला अटक होऊन शिक्षा होऊपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आपण उपोषणाची परवानगी मागितली, मात्र ती देण्यात आलेली नाही. तरीही आपण पाच मार्चपासून उपोषण करणार आहोत. याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही जरे यांनी म्हटले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here