वाचा:
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. भाजपचे नेते रोजच्या रोज महाविकास आघाडी सरकारवर टीकेच्या तोफा डागत आहेत. त्यामुळं राठोड यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर, ‘राज्याचे मुख्यमंत्री शांत बसलेले नाहीत. ते कुठल्याही गोष्टीपासून अनभिज्ञ नाहीत. जे जे घडतंय, ते सर्व त्यांना माहीत आहे. त्यांचं प्रत्येक घडामोडींकडं लक्ष आहे. मुख्यमंत्री अत्यंत जागरूक, संवेदनशील आणि न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत,’ असं राऊत म्हणाले होते.
राऊत यांच्या या वक्तव्याचा भातखळकर यांनी तिरकस शब्दांत समाचार घेतला आहे. ‘राजा हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला आहे. हे मिस्टर सत्यवादी फक्त सत्ता आणि टक्केवारीसाठी घसरतात. गब्रूच्या बाबतीत प्रश्न सत्तेचा आहे एवढीच अडचण आहे,’ असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
‘चित्रा वाघ ‘गब्रू प्रकरणी’ रोज सरकारची लाज काढताहेत, त्यामुळं कागदी वाघानं त्यांच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ट लावलं. कमाल आहे ठाकरे सरकारची, बलात्काऱ्यावर कारवाई करण्याची धमक नाही. आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करताहेत. काय लायकीची माणसं आहेत ही?,’ असं भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times