म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर
‘राज्यातील आघाडी सरकारच्या (maha vikas aghadi govt) मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाले आहे. नागरिकांची कामे करणे, त्यांना सोयीसुविधा पुरविणे ही कामे करण्यापेक्षा सरकारमधील मंत्र्यांमध्ये महिलांवर अत्याचार करण्याची चढाओढ लागली आहे,’ असा आरोप नगर शहर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा यांनी केला. (what kind of competition has taken place among the ministers asks leader )

भाजपा शहर महिला आघाडीच्या वतीने दिल्लीगेटसमोर वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राठोड यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. काही काळ रास्तारोको आंदोलनही झाले.

यावेळी वल्लाकटी म्हणाल्या, ‘अलीकडेच उघडकीस आलेले वन मंत्री राठोड यांचे प्रकरण भयानक आहे. युवतीवर अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे भक्कम पुरावे राठोड यांच्या विरोधात आहेत. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांचा अद्याप राजीनामा न घेता या प्रकरणाकडे डोळेझाक करीत आहेत. आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात महिला असुरक्षित आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला.

क्लिक करा आणि वाचा-

प्रदेश सरचिटणीस सुरेखा विद्ये म्हणाल्या, ‘तिघाडीमुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे हात दबलेले असल्याने ते सक्षम निर्णय घेताना दिसत नाहीत. अत्याचार करणार्‍या मंत्र्यांना ते पाठीशी घालत आहेत. त्यांनी ताबडतोब मंत्री राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर भाजपा महिला आघाडी शांत न बसता अधिक तीव्र आंदोलन करील,’ असा इशाराही त्यांनी दिला.

क्लिक करा आणि वाचा-

यावेळी महिला आघाडीच्या सदस्या शुभांगी साठे, नम्रता सगम, सविता सामल, अर्चना चौधरी, संध्या पावसे, ललिता कोटा, अश्‍विनी करांडे उपस्थित होत्या.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here