मुंबई : आघाडीची डेअरी कंपनी हॅटसन अ‍ॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेड (एचएपी) ने महाराष्ट्रातील सोलापुरात नव्याने स्थापित ग्रीनफिल्ड दुग्ध प्रक्रिया प्रकल्पात व्यावसायिक उत्पादनाची घोषणा केली. संपूर्णपणे , देशातील तंत्रज्ञानदृष्ट्या श्रेष्ठ असा हा प्रकल्प महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात १३० कोटी खर्च करून ७२ एकर जागेवर उभारला असून दररोज ६ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्यासाठी जर्मनीकडून आयात केलेली विशेष उपकरणे (एलएलपीडी) या प्रकल्पामध्ये आहेत.

प्रकल्पाच्या डिझाइनचा जोर कर्मचारी सुरक्षा, उत्पादनाची स्वच्छता आणि उत्कृष्टगुणवत्तेची उत्पादने बनविणे यावर आहे. एचएपीने पावसाच्या पाण्याचा साठा करण्यासाठी प्रकल्पाच्या आवारात १.२५ कोटी लिटर क्षमतेचा तलाव तयार केला आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये प्रकल्पांचे जाळे असलेल्या एचएपीचा हा १९ वा निर्मिती प्रकल्प आहे.

एचएपीच्या ५ राज्यांमधील सर्व निर्मिती प्रकल्पांची एकूण दूध प्रक्रिया करण्याची क्षमता ५२.५० एलएलपीडी इतकी आहे. एचएपी सोलापूरमधील या प्रकल्पामध्ये निरनिराळ्या उत्पादनांची निर्मिती करण्याचा विचार करीत असून राज्यात ३००० हून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देईल. या व्यतिरिक्त, हा प्रकल्प स्थापित केल्यामुळे दुग्ध व्यावसायिकांना मुख्य प्रवाहाच्या नेटवर्कबरोबर जोडण्यास मदत होईल आणि महाराष्ट्रातील ७५००० ते ९०००० दुग्ध उत्पादकांच्या उत्पन्नास चालना मिळेल.

यावर बोलतांना हॅट्सन अ‍ॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेडचे अध्यक्ष आर.जी.चंद्रमोहन म्हणाले, “महाराष्ट्र राज्यात उत्पादन सुरू झाल्याने एचएपी आनंदी आहे. महाराष्ट्र हे एक अष्टपैलू राज्य आहे जे दुग्ध उद्योगासाठी उत्कृष्ट विकासाची संधी देते आणि एचएपीने आपला पाया बळकट करण्यासाठी व पश्चिम भागात पुढील विकासाचे प्रवेशद्वार उपलब्ध करुन देण्यासाठी हा प्रकल्प उभारला आहे. ‘आरोक्या’, ‘हॅटसन’, ‘अरुण आईसक्रीम्स’, ‘इबॅको’ या ब्रँडसह कंपनी बाजारात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here