मुंबई: अभिनेत्री माधुरी दीक्षितनं एकेकाळी आपल्या अभिनयानं सर्वांनाच
वेड लावलं होतं. अनेक अभिनेते तिच्या प्रेमात वेडे होते. पण माधुरीनं डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न करत अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. माधुरी आणि श्रीराम नेने यांची जोडी सोशल मीडियावर नेह
मीच चर्चेत असते. दोघंही सोशल मीडियावर बरेच सक्रिय आहेत पण यासोबतच श्रीराम नेने एक आदर्श पती सुद्धा आहेत. हे माधुरीच्या सोशल मीडिया पोस्टवरून लक्षात येतं.

श्रीराम नेने केवळ एक चांगले डॉक्टरच नाही तर आदर्श पती सुद्धा आहेत. त्यांच्याकडे अनेक कौशल्य आहेत आणि त्यासोबतच बायकोला इम्प्रेस कसं करायचं हे त्यांना चांगलच माहीत आहे. नुकतंच त्यांनी माधुरीसाठी कुकिंग करत तिला इम्प्रेस केलं आहे. त्यांनी माधुरीसाठी घरीच स्वतःच्या हातांनी पिझ्झा बनवला. एवढंच नाही तर त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ते माधुरीला पिझ्झा भरवताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, होममेड पिझ्झा… लवकरच माझ्या युट्यूब चॅनेलवर… तुमची आवडती डिश कोणती आहे.

माधुरी आणि श्रीराम नेने यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी डॉक्टर नेने यांचं कौतुक केलं आहे. एका युझरनं लिहिलं, ‘व्वा, हे खूपच टेस्टी दिसत आहे…तर तुम्ही चांगले कुकसुद्धा आहात… माधुरीजी लकी आहेत.’ तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, ‘तुम्हा दोघांनाही असं आनंदी पाहून खूप छान वाटतं, तुम्हाला कोणाची नजर नको लागायला.’

माधुरी दीक्षितनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘लहान असताना मी थोडंफार स्वयंपाक करायला शिकले होते. पण नंतर करिअरच्या ओघात आणखी चांगल्या पद्धतीनं करायला शिकणं राहून गेलं. त्यानंतर मी लग्न झाल्यावर उत्तम स्वयंपाक करायला शिकले.’ नेहमीच नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. जे अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. या फोटोंमध्ये या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळते. श्रीराम नेने अभिनय क्षेत्रात नसले तरी सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here