‘वानवडी पोलिस योग्य तपास करतील’
सुरेश खोपडे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, पूजा चव्हाण मृत्यूचा तपास व्हायला पाहिजे. दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. पूजाचा मृत्यू म्हटले तर अपघात किंवा आत्महत्या या दोन शक्यता आजवर आलेल्या बातम्या आणिआरोपांवरून वाटते. मी ३५ वर्षे पोलिस दलात नोकरी केली. अनुभवी व चाणाक्ष पोलिस अधिकाऱ्याने दोन तास घटना स्थळावर तपास केला, तर तो खून आहे की अपघात आहे ,की आत्महत्या आहे की….. आहे ते आम्ही ९९ टक्के ओळखतो. एखाद्या घटनेमध्ये खून असेल तर तो राजकीय दबावाखाली दडपला जातो का?, माझे मत असे की मुळीच नाही. कारण पोलिस स्टेशन हे काही एकमेव तपास करण्याची यंत्रणा नव्हे. क्राइम ब्रँच, सीआयडी क्राइम, सीबीआय… तपास घेवू शकतात. त्यात जर आढळले की पोलिस अधिकाऱ्याने माहिती दडविली तर तो अधिकारी सह आरोपी (co accused) केला जावू शकतो. हल्ली कोणीही कोणाला वाचवू शकत नाही. त्यामुळे वानवडी पोलिस योग्य तपास करतील अशी खात्री वाटते.
चित्रा वाघ एवढ्या आक्रमक व्हायचे कारण काय?
माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे पुढे म्हणतात, ‘या प्रकरणात सत्ताधारी मंत्र्याचे नाव घेतले जाते. अशा प्रकरणाध्ये राजकीय दबाव असू शकतो. पण, त्याच बरोबर पोलिसांवर विरोधी पक्ष, मीडिया, सामान्य जनता, सोशल मीडिया, सद्सद्विवेक बुध्दी यांचा दबाव असतो. तो भारी ठरतो. तरीही चित्रा वाघ नावाची महिला एवढा आकांड तांडव का करते? त्यांनी तपास पूर्ण व्हायची वाट पाहायला पाहिजे असे वाटते. पूजा चव्हाण प्रकरणाचा खरा तपास व्हायला पाहिजे हे मान्य. दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे, पण तिच्या आईवडिलांचा संशय नाही. ती २१ वर्षाची मुलगी. कस जगायचं याचा पूर्ण अधिकार तिला आहे. राज्यघटना तसा तिला पूर्ण अधिकार देते. मग चित्रा वाघ एवढ्या आक्रमक व्हायचे कारण काय?’
क्लिक करा आणि वाचा-
‘पक्ष बदलून वैचारिक अध:पतन’
ते पुढे म्हणतात, ‘एका पूर्ण धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्षातून आरएसएसच्या तत्वज्ञानावर आधारित भाजपमध्ये चित्रा वाघ यांनी उडी घेतली. का घेतली हे त्यांना नसेल पण लोकांना माहीत आहे. दास, शूद्र व स्त्रीचे ताडण केले पाहिजे अशी विचारधारा असलेल्या प्राचीन संस्कृतीचे पुनर्जीवन करण्यासाठी निर्माण झालेल्या पक्षात चित्राताई सामील झाल्यात. तिथल्या स्त्रियांबद्दल चित्राताई किती वेळा पोलिस स्टेशन मध्ये गेल्या? पूजा नावाच्या सज्ञान महिलेचे खाजगी आयुष्य तुम्ही वेशीवर टांगत आहात. पक्ष बदलून तुम्ही केलेले बंड हे केवढे मोठे वैचारिक अध:पतन आहे हे ही लक्षात घ्या!’
क्लिक करा आणि वाचा-
‘एकांगी भूमिका घेऊन वाघीण बनता येत नाही’
वाघ कधीच पिसाळत नाही. वाघीण पिसळते. जेंव्हा तिच्या पिल्लावर हल्ला होतो तेंव्हा! प्रश्न असा आहे की चित्रा वाघ यांच्या पोटच्या मुलीने पूजा चव्हाण हिच्यासारखे वर्तन केले असते, तर चित्रा वाघ अशा वागल्या असत्या का? मुळीच नाही! चित्रा वाघ अशा का वागतात? चित्राताई, देवेंद्र नावाच्या भावाला व वहिनींना खुश करण्यासाठी तुम्ही मेहनत घेत असाल, तर हे जोडपे हिंदुत्वाच्या नावाखाली मनुस्मृतीवर आधारित संस्कृती आणण्याचा विचार मांडतात. पण तुमच्या वहिनीच्या कृतीतील संस्कृतीत ते दिसत नाही. त्यावर ही बोला! अशी एकांगी भूमिका घेवून वाघीण बनता येणार नाही!
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times