राज्याच्या मुख्यसचिवपदासाठी सीताराम कुंटे यांच्या नावासोबतच प्रवीण परदेशी यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीताराम कुंटे यांना पसंती दिली. सीताराम कुंटे राज्याच्या मुख्य सचिवपदावर केवळ ९ महिने काम करू शकणार आहेत. याचे कारण म्हणजे कुंटे हे नोव्हेंबर २०२१ मध्ये सेवानिवृत्त होत आहेत.
सीताराम कुंटे हे सध्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार हे २८ फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहे. त्यांना निवृत्तीनंतर महाराष्ट्र वीज नियामक आयोगात पाठण्यात येईल असे सूत्रांकडून कळते.
राज्यात करोनाने पुन्हा डोके वर काढले असून ती परिस्थिती हाताळण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे कुंटे यांनी मुंबई मिररशी बोलताना म्हटले आहे. त्याच प्रमाणे राज्याची आर्थिक स्थितीत सुधारणा करणे आणि राज्यातील मोठे प्रकल्प कार्यान्वित करणे अशा कामांना आपण प्राधान्य देणार असल्याचेही कुंटे यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
गृह विभागाच्या मुख्य सचिवपदी कोण?
सीताराम कुंटे हे बनल्यानंतर मंत्रालयात दुसरे सर्वात महत्वाचे पद समजल्या जाणाऱ्या गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कोणाची वर्णी लागणार याची मंत्रालयात जोरदार चर्चा आहे. सीताराम कुंटे यांच्यानंतर या पदावर मनुकुमार श्रीवास्वव यांचे नाव सर्वात पुढे आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times