मुंबई: ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि यांचे शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. सेंगर कर्करोगाने आजारी होते. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर नागाइच यांच्याकडे त्याच्यावर उपचार सुरू होते.

कैलाश सेंगर यांचा १६ फेब्रुवारी १९५१ मध्ये नागपूर येथे जन्मलेले सेंगर यांनी अकोला येथील मिडल स्कूल आणि खामगाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर ते टाइम्स ऑफ इंडिया समूहातील डॉ. धर्मवीर भारती यांच्या ‘धर्मयुग’मधून सन १९८३ पासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. सन १९९२ मध्ये ते नवभारत टाइम्समध्ये रुजू झाले. नवभारत टाइम्समधील आईना हा त्यांचा स्तंभ विशेष गाजला.

कैलाश सेंगर यांना आशीर्वाद साहित्य कला मंचाचा सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’ पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांचे गीत-गझल संग्रह ‘सूरज तुम्हारा हैं’ आणि ‘आदमी को परोस कर देखो’ हे गझल संग्रह लोकप्रिय झाले होते. त्यांच्या ‘सुबह होने का इंतजार’ है या कथा संग्रहाला देखील लोकांनी पसंती दिली.

क्लिक करा आणि वाचा-

हिंदी गझलांमध्ये विशिष्ट प्रयोगांसाठी असलेल्या अनेक शोधग्रंथांमध्ये सेंगर यांचा उल्लेख करण्यात आला आहे. १९८० आणि १९८१ च्या श्रेष्ठ हिंदी कथा आणि मुस्लिम परिवेश की श्रेष्ठ हिंदी कहानियां, समकालीन सृजन-कविता इस समय अशा महत्वाच्या संकलनांमध्ये त्यांच्या कथा आणि कविता प्रकाशित करण्यात आल्या आहेत. अनेक भाषांमध्ये त्यांच्या कविता अनुवादित झाल्या आहेत. कवी कैलाश सेंगर हास्य कवि संमेलनांमध्ये देखील अतिशय लोकप्रिय होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here