मुंबई: राज्यावरील करोनाचे संकट गडद होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा राज्यात ८ हजारावर नवीन बाधित रुग्ण आढळले असून अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा पाऊण लाखाच्या जवळ पोहचल्याने ही खूप मोठी धोक्याची घंटा ठरली आहे. दरम्यान, व अचलपूर या शहरांत करोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून या दोन्ही शहरांत ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ( )

वाचा:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत मोठी करोना रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावले जात असले तरी रुग्णसंख्येला ब्रेक लागत नसल्याने चिंता वाढू लागली आहे. दुसरीकडे , आणि पुणे या शहरांतही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता बळावत चालली आहे.

वाचा:

राज्यात आज ५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत करोना संसर्गामुळे ५२ हजार ९२ रुग्णांना प्राणास मुकावे लागले आहे. सध्या राज्यातील २.४३ टक्के एवढा आहे. राज्यात आज ८ हजार ६२३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३ हजार ६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण २० लाख २० हजार ९५१ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.१४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६१ लाख ९९ हजार ८१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ४६ हजार ७७७ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ३४ हजार १०२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ३ हजार ८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

करोनाचे ७२ हजार ५३० ॲक्टिव्ह रुग्ण
राज्यात गेले काही दिवस सातत्याने आठ हजारावर नवीन बाधित आढळत आहेत. त्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा फुगत चालला आहे. राज्यात सध्या करोनाचे ७२ हजार ५३० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक १३ हजार ६९२ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल ९ हजार ७६८ अॅक्टिव्ह रुग्ण नागपूर जिल्ह्यात आहेत. मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ८० झाली आहे तर ठाण्यात हा आकडा ७ हजार ६६५ इतका झाला आहे. करोनाचा नवा हॉटस्पॉट ठरलेल्या अमरावती जिल्ह्यात सध्या ६ हजार ५७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here