महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली (). या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी त्यांनी वनमंत्री संजय राठोड याच्या नावाचा उल्लेख न करता आपली प्रतक्रिया व्यक्त केली आहे. उदयनराजे म्हणाले की, ‘लोकशाहीत आमदार, खासदार हे निवडून दिलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने वागायले पाहिजे. तसेच त्यांनी जबाबदाराने आपले काम करायला हवे. प्रत्येकाने नैतिक जबाबदारीने देखील वागले पाहिजे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. चुकीचे केले असेल तर शिक्षा ही व्हायलाच हवी. उदयनराजे असले तरी शिक्षा व्हावी’
राज यांच्याशी आरक्षणावर केली चर्चा
आपली राज ठाकरे यांच्याशी कोणतीही राजकारणाची किंवा पक्षीय स्तरावरील चर्चा झालेली नसल्याचे उदयनराजे म्हणाले. एका कौटुंबिक सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आपण येथे आल्याचे ते म्हणाले. मात्र, ठाकरे यांच्याशी आपण मराठा आरक्षणावर बोललो असल्याचे ते म्हणाले. मागे आपण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली होती, असे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
मराठा आरक्षणाच्या प्रश्नात कोणीही राजकारण आणता कामा नये असे आपण त्यांना सांगितल्याचे खासदार भोसले म्हणाले. कोणाच्या आरक्षणावर गदा देखील येऊ नये ही आपली भूमिका आहे. तसेच इतर समाजातील नेत्यांना जसा न्याय मिळाला तसा मराठा समाजातील लोकांना देखील मिळायला हवा. शिवाजी महाराजांचा विचार जपला गेला पाहिजे, नाहीतर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असे उदयनराजे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
उद्या रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीचे आयोजन केले असून त्या बैठकीतही आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होईल असेही ते पुढे म्हणाले.
राज ठाकरेंना दिली राजमुद्रा भेट
उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरे यांना या भेटीत राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज येथे आले होते. राज ठाकरे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान केला.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times