अहमदाबाद, : नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच चौथा कसोटी सामनाही खेळवण्यात येणार आहे. याच मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेला तिसरा कसोटी सामना हा दोन दिवसांत संपला होता. त्यामुळे आता खेळपट्टीवर जोरदार टीका होत आहे. पण आता चौथ्या सामन्यासाठी पेच असेल तरी कसे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

तिसरा कसोटी सामना दोन दिवसांत संपल्यामुळे आयसीसीची या पीचवर नजर आहे. जर चौथा सामनाही असाच लवकर संपला तर आयसीसी या खेळपट्टीवर कारवाई करु शकते आणि या मैदानात काही कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय सामने होऊ शकणार नाहीत. त्यामुळे आता चौथ्या कसोटीसाठी कशी खेळपट्टी बनवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. चौथा कसोटी सामना हा ४ ते ८ मार्च या कालावधीत होणार आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या पीचबद्दल माहिती देताना सांगितले की, ” चौथ्या कसोटीसाठी बनवण्यात येणारी पीच ही फलंदाजांसाठी अनुकूल असेल. या खेळपट्टीवर चेंडू समान उंचीवर राहतील, ते जास्त वर किंवा खाली राहणार नाहीत.”

या मालिकेनंतर फार महत्वाच्या स्पर्धा भारतामध्ये होणार आहेत. यामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचाही समावेश आहे. त्याचबरोबर एप्रिल महिन्यापासून आयपीएलही सुरु होणार आहे. त्यामुळे या मैदानात जर या दोन्ही स्पर्धा खेळवायच्या असतील तर त्यासाठी या स्टेडियमच्या खेळपट्टीवर कोणताही ठपका असून चालणार नाही. या मैदानात दोन कसोटी सामने होणार आहे. त्यामुळे जर आयसीसीला या मैदानाबाबत किंवा पीचबाबत निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना दोन्ही सामन्यांचा विचार करावा लागेल. त्यामुळे आता या मैदानातील दुसरा सामना किती दिवस चालतो, यावर सर्वकाही अवलंबून असेल.

तिसऱ्या कसोटीनंतर खेळपट्टीवर जोरदार टीका व्हायला लागली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबरच माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी खेळपट्टीची पाठराखण केली आणि त्यांना टीकेचे धनी व्हायला लागले. पण आता अश्विनने खेळपट्टीच्या टीकेवर एक साधे उदाहरण देत त्यांचं तोंड बंद केल्याचं पाहायला मिळत आहे. अश्विनने यावेळी सांगितले की, “जेव्हा भारतामध्ये एखादी गोष्ट घडते तेव्हाच हा विषय निघतो. पण जेव्हा परदेशामध्ये अशी गोष्ट घडते, तेव्हा त्याबद्दल कोणीच बोलत नाही. आम्ही जेव्हा न्यूधीलंडमध्ये गेलो होतो तेव्हा दोन कसोटी सामने फक्त पाच दिवसांमध्ये संपले होते. त्यावेळी विराट कोहलीने कोणतीच तक्रार केली नव्हती. त्यावेळी कोणीही खेळपट्टीबद्दल काही बोलले नव्हते किंवा खेळपट्टीवर टीका झाली नव्हती. त्यामुळे मला या सर्व गोष्टी फार मजेशीर वाटत आहेत. ”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here