अहमदाबाद, : काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपण डिप्रेशनमध्ये आलो होतो, असा खुलासा केला होता. त्यावर आता भारताच्या एका माजी खेळाडूने त्याला एक प्रश्न विचारला आहे. या माजी क्रिकेटपटूने कोहलीला विचारले आहे की, ” एवढी सुंदर पत्नी असताना तु डिप्रेशमध्ये कसा जाऊ शकतोस?”

भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअरने यावेळी सांगितले की, ” एवढी सुंदर पत्नी असताना आणि आता तर तुला बाळंही झाले आहे. त्यामुळे देवाचे आभार मानण्यासाठी तुझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. डिप्रेशन ही पश्चिमांतील देशांचा विचार आहे. भारतीयांकडे अशी ताकद असते की, ते यामुळे या डिप्रेशनपासून वाचू शकतात. फक्त मानसीक परिस्थिती नाही, तर आपल्याकडे एवढी ताकद आहे की, आपण कोणत्याही परिस्थितीचा सक्षमपणे सामना करु शकतो.”

कोहलीबरोबर यावेळी संवाद साधला होता तो इंग्लंडचा माजी खेळाडू मार्क निकोल्सने. त्यावेळी कोहलीने एक गोष्ट स्विकार केली की, त्याच्या कारकिर्दीतील तो सर्वात कठिण वेळ होता. त्यावेळी सातत्याने त्याला अपयश मिळत होते आणि असं अपयश मिळणारा मी जगातील एकटाच व्यक्ती आहे, असंही त्याला वाटत होतं. त्या कालावधीत मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो”

कोहलीसाठी २०१४ साली झालेला इंग्लंडचा दौरा निराशाजनक होता. या दौऱ्यात कोहली पाच कसोटी सामन्यांमध्ये खेळला होता. या पाच कसोटी सामन्यांमध्ये कोहलीची सर्वाधिक धावसंख्या ३९ ही होती. त्याच़बरोबर सहावेळा तर कोहलीला दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नव्हती. त्यावेळी १० डावांमध्ये फलंदाजी करताना कोहलीची सरासरी ही १३.५० एवढी होती. त्याचबरोबर १, ८, २५, ०, ३९, २८, ०, ७, ६ आणि २० अशी त्याची धावसंख्या होती. पण त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात कोहलीने ही कसर भरुन काढली होती.

विराट कोहली याबाबत म्हणाला होती की, ” माझ्याबाबती अशा काही गोष्टी घडल्या आहेत की, त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. हे विचार करुन नक्कीच चांगलं वाटत नव्हतं की, तुझ्याकडून धावाच होत नाहीत. काहीही केलं तरी धावाच होत नव्हत्या. मला असं वाटतं की, सर्व फलंदाजांच्या बाबतीत ही गोष्ट पाहायला मिळते. त्यावेळी तुम्हाला वाटत असतं की, तुमचं काही गोष्टींवर नियंत्रणच नाही. त्यावेळी तुम्हाला हे समजत नसतं की हा कठीण काळ कसा घालवायचा आहे. पण ती एक वेळ हती. कारण ज्या गोष्टी घडत होत्या, त्या बदलण्यासाठी मी काहीही करु शकत नव्हतो. मला या कठीण काळातही पाठिंबा देणारे लोक होते, पण तरीही त्यावेळी मला असं वाटायचं की, मी एकटाच आहे.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here