कोल्हापूर : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील सत्ता बदलात ‘करेक्ट कार्यक्रम’ नव्हे तर घोडेबाजार झाला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केला आहे. भाजपच्या सात सदस्यांना फोडत महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आणली गेली. काँग्रेसचा महापौर तर काँग्रेसचा उमेदवार उपमहापौर झाला. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे थेट नाव न घेता तोफ डागली. ( )

वाचा:

सांगली पालिकेत महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिल्यानंतर ‘जलसंपदा मंत्री यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला’ असे पोष्टर सांगलीत झळकले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर जोरदार पलटवार केला. सांगली महापालिकेत ‘करेक्ट कार्यक्रम’ नव्हे तर सत्तेसाठी अक्षरश: घोडेबाजार केला गेला, अशी टीका त्यांनी केली. निवडणुकीत भाजपसोबत दगाफटका करणाऱ्या पक्षाच्या ‘त्या’ सात नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही पाटील म्हणाले.

वाचा:

‘महापौर, उपमहापौर निवडीच्या अगोदर दोन दिवस भाजपच्या सदस्यांची बैठक घेतली होती. सगळ्यांसोबत चर्चा केली होती. पण प्रत्यक्ष निवडणुकीदिवशी वेगळा प्रकार घडला. हा काही करेक्ट कार्यक्रम नव्हे तर सत्तेसाठी घोडेबाजार होता. भाजपच्या नगरसेवकांना पळवून नेले. त्यांच्यासोबत संवाद घडू दिला नाही. सत्तेसाठी घोडेबाजार आणि सत्तेच्या बळावर कोर्टातील केसेस काढून घेऊ असे सांगत नगरसेवकांना पळवून नेले. सांगलीतील सगळ्या घडामोडीची माहिती घेतली आहे, अहवाल तयार आहे. ज्यांनी भाजपसोबत फसगत केली त्यांना नोटिसा काढल्या जातील. अशा लोकांना नागरिकच योग्य उत्तर देतील’, असेही पाटील यांनी पुढे नमूद केले.

सांगलीत नेमकं काय घडलं?

सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली. पालिकेतील ७८ पैकी ४१ सदस्य भाजपचे असतानाही भाजपला पराभव पाहावा लागला. १५ सदस्य असलेल्या राष्ट्रवादीचा महापौर झाला तर २० सदस्य असलेल्या काँग्रेसचा उपमहापौर झाला. या निवडणुकीत भाजपचे सात नगरसेवक फोडत महाविकास आघाडीने बाजी मारली. निवडणुकीआधी पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू होत्या. जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील या दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. त्यात जयंत पाटील यांची व्यूहरचना सरस ठरली आणि भाजपला हातची सांगली पालिका गमवावी लागली. या निकालानंतर आज प्रथमच चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून सांगली गमावल्याची अस्वस्थता त्यांच्या बोलण्यातून स्पष्टच दिसत होती.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here