म. टा. प्रतिनिधी, मुंबई

वनमंत्री यांच्यावर आरोपांचा धुरळा उडत असतानाच, या प्रश्नावरून भाजप नेत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. किशोर वाघ यांच्यावर १२ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला असून, भाजपच्या काळात २०१६मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुली चौकशी सुरू केली होती. आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात. त्यामुळे दिशाभूल करू नये, असा टोला मिटकरी यांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.

किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकारला जाब विचारल्यामुळेच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे मिटकरी यांनी ट्वीट करून त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी ट्वीटमध्ये वाघ यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. किशोर वाघ यांच्यावर १२ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झालेला आहे. त्याहीपेक्षा २०१६ रोजी भाजपनेच याबाबत खुली चौकशी लावलेली आहे, असा खुलासा मिटकरी यांनी केला. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसता तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याप्रकरणी गुन्हा दाखल केला असता, असा दावाही त्यांनी केला. मिटकरी यांनी एसीबीने दाखल केलेल्या एफआरआयची प्रतसुद्धा ट्विटरवर पोस्ट केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चित्रा वाघ पत्रकार परिषदा घेऊन राज्य सरकारवर टीका करीत आहेत. वनमंत्री राठोड यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्याचे बोलून दाखवले होते. याच मुद्द्यावरून मिटकरी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

कथित लाच प्रकरणातील मुख्य आरोपी गांधी रुग्णालयाचे तत्कालीन महानिरीक्षक गजानन भगत यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांची अजून चौकशीच सुरू आहे. २०११पासून एसीबीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. मग माझ्या नवऱ्यावरच गुन्हा दाखल कसा करण्यात आला, असा सवाल चित्रा वाघ यांनी सरकारला विचारला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here