वनमंत्री संजय राठोड हे पत्नी शीतल राठोड आणि त्यांचे मेहुणे सचिन नाईक यांच्यासह चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास वर्षा बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर राठोड राजीनामा देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा दिला असला तरी देखील तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याच्याकडे गेल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. आज राज्याच्या मंत्रिमंडळ बैठक होत असून या बैठकीत मुख्यमंत्री राजीनाम्या बाबात माहिती देतील असे बोलले जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री राजीनाम्याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विरोधकांचा मोठा मुद्दा शिवसेनेने निष्प्रभ केल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times