हा उशिरा आलेला राजीनामा
उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून विरोधी पक्षांची या प्रकरणी काय भूमिका असेल हे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सूचित केले आहे. हा उशिरा आलेला राजीनामा आहे. मात्र या प्रकरणात संजय राठोड यांना वाचवण्याचा सर्व प्रयत्न झालेला आहे. सर्वांच्या दबावामुळे सरकारला उपाय उरला नसल्याने हा राजीनामा घेतला गेला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आज २० दिवसांचा कालावधी लोटला. त्यानंतर आता संजय राठोड राजीनामा देत आहेत. याचाच अर्थ त्यांना सरकारचा आशीर्वाद होता. भाजपच्या महिला आघाडीचे आंदोलन, मीडियाचा दबाव नसता तर सरकारने संजय राठोड यांना वाचवलेच असते, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा- फडणवीस
या प्रकरणाला आज २० दिवस झाले. या प्रकरणी संजय राठोड यांच्याविरोधात अनेक पुरावे आहेत. असे असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर २० दिवसांनंतरही एफआयआर दाखल केलेला नाही. या मुळे प्रथम संजय राठोड यांना पाठिशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
जो पर्यंत पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तो पर्यंत भारतीय जनता पक्षाचे आंदोलन सुरूच राहील असेही फडणवीस म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times