पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्यानंतर आज दुसऱ्यादा ते प्रसारमाध्यमांमोर आले. मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आपले म्हणणे मांडत होते.
गेल्या अनेक दिवसांपासून माझी बदनामी करण्यात येत आहे. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला. मी गेले ३० वर्षे सार्वजनिक जीवनात आले. या माझ्या कारकिर्दीतूनच मला उठवण्याचा प्रयत्न झाला, असे म्हणत संजय राठोड यांनी विरोधी पक्षांवर टीकेचे प्रहार केले.
क्लिक करा आणि वाचा-
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, याच कारणामुळे मी मंत्रिपदापासून बाजूला होत आहे, असे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे संजय राठोड म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा देत असताना माझ्या सोबत अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित होते, असेही राठोड म्हणाले. चौकशी होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर राहायला हवे ही माझी भूमिका असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
विरोधकांवर केली टीका
आपण राजीनामा दिल्याची माहिती देत असताना संजय राठोड यांनी विरोधी पक्षांवर टीकेचे प्रहार केले. या प्रकरणी विरोधी पक्षाने अतिशय घाणेरड्या पद्धतीने राजकारण केले. उद्याचे अधिवेशन आपण चालवू देणार नाही असे विरोधक म्हणत आहे, मात्र त्यांची ही भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेविरुद्ध आहे. माझ्या समाजावर या आरोपांचा जो परिणाम झाला तो पाहून मी मंत्रिपदापासून बाजूला झालो. या प्रकरणी तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि खरे सत्य बाहेर यावे ही आपली भूमिका असल्याचे राठोड म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times