मुंबईः मृत्यू प्रकरणी शिवसेनाच्या यांना अखेर वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे संजय राठोड यांनी राजीनामा दिली आहे. पण जिच्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला ती पूजा चव्हाण कोण होती?

पूजा चव्हाण ही २२ वर्षांची तरुणी होती. पुण्यातील वानवडी भागातील इमारतीच्या गॅलरीतून उडी घेऊन पूजाने आत्महत्या केल्याचा बोललं जातंय. पण तिने आत्महत्या केली की तिला प्रवृत्त केलं गेलं की तिची हत्या झाली? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

पूजा चव्हाण ही मूळची बीड जिल्ह्यातील परळीची तरुणी होती. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय होती. एवढचं नव्हे तर टीकटॉक स्टार म्हणूनही ती प्रसिद्ध होती. अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये ती सहभागी होत होती. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतन मुंडे यांच्यासोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर आहेत. त्याचबरोबर संजय राठोड यांच्यासोबतचेही तिचे फोटो सोशल मीडियावर आहेत.

पुजाने ७ फेब्रुवारीला आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. पण या घटनेच्या काही दिवस आधी पूजा बीडवरून पुण्यात आली होती. इंग्लीश स्पिकिंगच्या क्लासेसाठी ती पुण्यात यायचं, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं होतं.

पूजा चव्हाणच्या घरची स्थिती जेमतेम असाना ती इतकी हायफाय कशी राहत होती. तिला महागड्या भेट वस्तू कुणी दिलाय? आत्महत्येनंतर तिच्या ऑडिओ क्लीप व्हायरल कशा काय झाल्या? संजय राठोड यांचा संबंध काय? असे प्रश्न तिच्या मृत्यूनंतर उपस्थित केले जात आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here