खरं तर, संस्कृतीने नुकतंच एक फोटोशूट केलं. त्याचे फोटो तिने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले होते. ते फोटो पाहून चाहत्यांमध्ये संस्कृतीच्या लग्नाची चर्चा जोर धरू लागलीये. संस्कृतीने एका कपड्यांच्या दुकानासाठी हे फोटोशूट केलं. या फोटोंमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तिने पेस्टल थीम असलेला नववधूचा लेहेंगा परिधान केला आहे आणि त्यावर हिरे आणि मोत्यांपासून तयार केलेले दागिने घातले आहेत. अनेकांनी तिच्या दिसण्याचं कौतुक केलं. परंतु तिच्या लग्नाची चर्चा या लूकमुळे नसून तिच्या सोबत फोटोशूटमध्ये असलेल्या जोडीदारामुळे आहे. या फोटोंमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ नवरदेवाच्या वेशात आहे.
यापूर्वी ते दोघे ‘धरला माझा हात’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता या जोडीचं नवं फोटोशूट समोर येत आहे. ते दोघेही फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. त्यावर सोनालीने तुम्ही एकत्र खूप छान दिसताय, अशी कमेंट केली आहे. परंतु महत्वाची गोष्ट अशी की, लग्नाच्या चर्चेचा अंदाज असल्याने संस्कृतीने आधीचं तिच्या फोटोंमध्ये कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं, ‘हे फोटो फक्त शूटसाठी आहेत. आम्ही रिलेशनशिपमध्ये नाही आणि आम्ही लग्नही करत नाही.’ तिच्या या कॅप्शनमुळे अनेक चाहत्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर लगेचं मिळत आहे. हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times