‘आमची वेदना कधीही भरून येणार नाही’
या पत्रात पूजाचे आईवडिल लिहितात की, आमची मुलगी कुमारी पूजा चव्हाण हिचा दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. कुठल्याही मातापित्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो. आमची ही वेदना कधीही भरून येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दु:खापेक्षा अधिक त्रासदायक आणि आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यूसंदर्भात होणारी चर्चा. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत. ज्या निराधार आहेत. आपण या संबंधी पोलिस चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा वेगाने तपास व्हावा. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. आपण निश्चितच कारवाई कराला याची खात्री आहे, असे पत्रात लिहिण्यात आले आहे.
‘संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन आरोपी ठरवू नका’
आमच्या मुलीचा बळी गेला, पण फक्त संशयावरून कोणाचा बळी जाऊ नये. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही. आम्ही आमची मुलगी गमावली, परंतु या आड राजकारण करून दररोज होणाऱ्या आरोपांनी तिचा रोज बळी जातोय. याचे राजकारण करून संजय राठोड यांना आरोपी ठरवून त्यांचा राजीनामा घेऊ नका.
क्लिक करा आणि वाचा-
‘राठोड दोषी असल्यास कारवाई करा’
तपासामध्ये राठोड किंवा अन्य कोणी दोषी असल्यास कठोर कारवाई करून न्याय द्यावा. परंतु संशयावरून मुलीवर किंवा कोणावरही आरोप करू नयेत. संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करून येथपर्यंत पोहोचले आहेत. फक्त संशयावरून त्यांचाही बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई करावी. राजकारणामुळे आणि दबावामुळे घाईत निर्णय घेऊ नये. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्याल.
क्लिक करा आणि वाचा-
या पत्राच्या शेवटी लहु चंदू चव्हाण, (वडिल), मंदोदरी लहू चव्हाण (आई) आणि दिव्याणी लहू चव्हाण (बहीण) यांच्या सह्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
पूजा चव्हाण हिचे आईवडिल आणि बहिणीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times