मुंबईः मृत्यू ( ) आणि ( ) प्रकरणावरून भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. खासकरून शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून मुख्यमंत्री ( ) यांनी भाजपसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सुनावत पलटवार केला आहे. संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. तसंच या प्रकणि निःपक्षाती चौकशीचे आदेश देण्यात आले असून पोलिसांना लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय राठोड यांनी दुपारी आपला राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारची संध्याकाळी साडेसहा वाजता पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. निःपक्षपाती चौकशी केली जाईल. सत्य बाहेर येईलच. त्यातून कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. जो कोणी दोषी असेल त्याला क्षमा केली जाणार नाही. पण हे सगळं होत असताना नुसती आदळआपट करून तपासाची दिशा भरकटवायची हा जो काही प्रघात घातला जातोय हा फार गंभीर आहे. पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. केवळ सत्ता नाही म्हणून आरोप करणं चुकीचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय राठोड प्रकरणात तपास होईलच आणि दोषींवर कारवाई होणारच. राठोड प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही. तपासाची दिशा भरकटवण्याचं काम केलं जातंय. राजीनामा घेणं आणि गुन्हा दाखल करून मोकळं म्हणजे न्याय नाही. पूजाचे आईवडील आपल्याला भेटले. कुटुंबाची बदनामी होत असल्याचं ते म्हणाले. ही बदनामी थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलं. या घटनेचा तपास वेगाने व्हावा आणि दोषींना शिक्षा कराल याबाबत आम्हाला खात्री आहे. या प्रकरणात पूजा चव्हाण हिच्या आईवडिलांचा कोणतीही तक्रार नाही, असं पूजा चव्हाणचे आईवडिलांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

राठोड यांच्यावरील प्रेमापोटी पोहरादेवी येथे लोकांनी गर्दी केली. त्यांनी नागरिकांना बोलावले नव्हते. या प्रकरणी तपास सुरू आहे. अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. एखाद्याला आयुष्यातून उठवायचं म्हणून तसा तपास होता कामा नये. आदळआपट करून तपासाची दिशा भरकटून टाकायचं काम करू नये. तपास होऊ. आता जे पोलिस आणि जी यंत्रणा हेत तीच तुमच्या काळातही होती. पण त्यांच्यावरच अविश्वास दाखवणार असाल तर पायावर कुऱ्हाड मारण्यासारकं आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.

प्रत्येक पाऊल टाकताना खूप समजूतदार पणाने आणि गांभीर्याने टाकावं लागतं. त्यात उथळपणा चालणार नाही. कुणाचाही जीव महत्त्वाचा असतो. ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेचा तपास होईल आणि दोषींवर कारवाई होईलच. यामुळे इतरांनाही कुठलीही शंका असण्याचं कारण नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

सत्तेत कुणी किती लाचारी स्वीकारली ही इतिहासात लिहिली जाते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. एकतर खोटं बोलून सत्ता आणली आणि सत्ता आल्यानंतर खोट्याचे इमले रचले. देश विकायला काढणारे म्हणून तुमच्याही सरकारची इतिहासात नोंद होईल. आरोप करताना जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे. समजू शकतो, समोर आलेलं चांगलं चित्र स्वतःच्या कर्माने त्यांनी भंग केलं आणि सरकार पडेल, सरकार पडेल असं म्हणत विरोधकांचं एक वर्ष झालं. हा भ्रम दूर झाला आहे. आता आम्ही मजबूतीने काम करत आहोत. तुमच्या मनताली खदखद जरूर काढा. सरकार चुकत असेल तर नक्की सांगा. पण केवळ आपली सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची आणि सरकारची बदनामी करू नका. कारण स्वतःच्याच घरचा काळ अशी सुद्धा इतिहासात आपली नोंद होऊ देऊ नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here