या बरोबरच राज्यात दिवसाला मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णसंख्येत कालच्या तुलेनेत काहीशी वाढ झाली आहे. आज राज्यात एकूण ६२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ५१ इतकी होती. आजची मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.४२ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख २४ हजार ७०४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९५ टक्के इतके झाले आहे.
तसेच राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६२ लाख ८४ हजार ६१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ५५ हजार ०७० नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.२३ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ३ लाख ३५ हजार ४९२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३ हजार ३३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील अॅक्टिव्ह (सक्रिय) रुग्णसंख्येत वाढ
राज्यात कालच्या तुलनेत अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढून ती आज एकूण ७७ हजार ००८ इतकी झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती ८ हजार २९९ इतकी झाली आहे. तर ठाण्यात ही संख्या ८ हजार ०७६ इतकी. तर, पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १५ हजार ००५ इतकी झाली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times