गेल्या सात वर्षांत विरोधी विचाराच्या व्यक्तीला संपवण्याचे घातक राजकारण देशात आकाराला आले आहे. संस्था आणि व्यक्तीस्वातंत्र्य संपवण्याचे षडयंत्र दिसत आहे. देशातील जनता शांत दिसत असली तरी आतून खदखद वाढली आहे. २०२४ मध्ये शांततेचा स्फोट झालेला दिसेल. सद्दाम हुसेन, हिटलर, डोनाल्ड ट्रम्प असे कुणीच नेते सत्तेचा अमरपट्टा बांधून आले नव्हते. नेत्याच्या वर्तनातून दंभ दिसतो तेव्हा इतिहास बदलतो, अशी टीका (Sanjay Raut) यांनी प्रकट मुलाखतीत केली. (the country is witnessing a conspiracy to eliminate the opposition says )
भीमशक्ती विचार मंच आणि माजी नगरसेवक चेतन कांबळे यांच्या वतीने आयोजित ‘जय भीम फेस्टिव्हल’मध्ये खासदार संजय राऊत यांची राजू परुळेकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. हॉटेल अजंठा अॅम्बेसेडर येथे रविवारी सायंकाळी मुलाखत पार पडली. देशातील राजकीय घडामोडींवर राऊत यांनी सडेतोड उत्तरे दिली.
‘देशात भाजप सरकार विरोधाचा सूर ठेवायचा नाही म्हणून विरोधकांचे प्रतिमाहनन करीत आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर सुरू आहे. देश विरोधकमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान, नेते येतात आणि जातात. मात्र, एकदा घडी विस्कटली तर देश टिकणार नाही. सध्या दिल्लीतील संसद मूक आणि बधीर झाली आहे. भाजपचे खासदार इतर पक्षाच्या खासदारांशी मोकळे बोलत नाहीत आणि हसत नाहीत. एवढा धाक संसदेत कधीच बघितला नव्हता. भाजप बहुमतात असूनही खासदारांना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही’, अशी टीका राऊत यांनी केली.
राज्यात वनमंत्री संजय राठोड यांना राजीमाना द्यावा लागल्याच्या मुद्द्यावर राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. ‘सात वर्षांत भाजपच्या मंत्र्यांवर आरोप होऊन एकानेही राजीनामा दिला नाही. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांचा आणि विरोधकांचा आवाज ऐकतात. संबंधित तरुणीच्या मृत्यूचा तपास पूर्ण झालेला नाही. तपासावर दबाव येऊ नये म्हणून नैतिकतेतून हा राजीनामा घेतला आहे, असे राऊत म्हणाले.
गुजरातचे माजी खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजपच्या नेत्यांची नावे आहेत. गुजरातमध्ये आत्महत्या केली तर कधीच चौकशी होणार नाही याची त्यांना कल्पना असल्याने मुंबईत आत्महत्या केली असावी. महाविकास आघाडी सरकार त्यांच्या मृत्यूची चौकशी करणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
राजभवनाचे अध:पतन
मंत्रिमंडळाने बारा सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे आठ महिन्यांपूर्वी दिली आहेत. नावांना मंजुरी देणे बंधनकारक आहे. संघ प्रचारक असलेल्या कोश्यारी यांना आपल्या विचाराचे सरकार राज्यात यावे, असे वाटते. हे सरळसरळ घटनेचे उल्लंघन आहे. यापूर्वी पहाटे शपथ देऊन त्यांनी घटनेचे उल्लंघन केले होते. पण, असे काळोखात चोरलेले विचार टिकत नसतात. राज्यपाल दिल्लीचे एजंट असतात. आता राजभवनाचे अध:पतन झाले आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times