माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राठोडांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. तर खासदार आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राठोड यांना अटक करण्याची मागणी केली.
‘अकार्यक्षम पोलिसांना निलंबित करा’
या प्रकरणात सुरवातीपासूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. एका मुलीची हत्या होऊन ही पोलिस संवेदनशील नाहीत. अशा पोलिसांवर कारवाई केली पाहिजे. अकार्यक्षम पोलिसांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी भाजप नेत्या यांनी केली आहे. फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, तर पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. राजीनाम्याने प्रश्न सुटलेले नाहीत. ते तसेच आहेत. यामुळे सरकारने चौकशी करावी. काही प्रश्न काही पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचा नाही. तर महाष्ट्रातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. यामुळे या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असं अशी मागणी वाघ यांनी केली.
मुख्यमंत्री, शिवसेनेने राठोडांना पाठिशी घातलंः राणे
संजय राठोड यांना अटक करायला पाहिजे. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री पक्षाचे नेते राठोड यांना पाठिशी घालत आहेत. राठोड यांचा राजीनामा इतक्या उशिरा घेतला गेला. पूजा चव्हाणने आत्महत्या केलेली नाही तर तिची हत्या झाली आहे. संजय राठोड हे दोषी आहे, असं नारायण राणे म्हणाले. तसंच संजय राठोड हे काही स्वतःहून राजीनामा देण्यासाठी पुढे आलेले नाहीत. भाजपच्या दबावामुळे हा राजीनामा द्यावा लागला आहे. शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला, असं भाजपचे खासदार नारायण राणे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा सुसंस्कृतपणाचा बुरखा फाटलाः भातखळकर
संजय राठोड यांनी अतिशय उशिरा राजीनामा दिला. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुसंस्कृतपणाचा बुरखा फाटला आहे. राठोड यांनी इतक्या उशिरा राजीनामा दिला आहे. गेल्या १८ दिवसांमध्ये पुरावे नष्ट करण्याचं काम करण्यात आलं. याला जबाबदार कोण? हा प्रश्न अधिवेशनात आम्ही विचारणार, असं भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times