सांगली: , उपमहापौर पदाच्या निवडणूकीत व्हिप डावलून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या व गैरहजर राहिलेल्या भाजपच्या सात फुटीर नगरसेवकांना अखेर कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येणार आहे. सोमवारी या नोटिसा संबधित नगरसवेकांना दिल्या जाणार असून, त्यांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली जाईल, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी दिली. (action will be taken against seven who were absent for voting)

महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत बहुमत असतानाही सत्ताधारी भाजपला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी हे महापौर, तर कॉग्रेसचे उमेश पाटील उपमहापौर पदी निवडून आले.

भाजपची सात मते फुटल्याने धीरज सूर्यवंशी व गजानन मगदूम यांना पराभव पत्कारावा लागला. सात पैकी आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे हे दोघे मतदानास गैरहजर राहिले तर स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, नसीमा नाईक, अपर्णा कदम व विजय घाटगे या पाच जणांनी थेट कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केले. यामुळे भाजपची सत्ता गेली.

क्लिक करा आणि वाचा-

दोन्ही कॉंग्रेसनी घोडेबाजार करत आमचे नगरसेवक फोडून सत्ता मिळवल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच फुटीर सात सदस्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अपात्र ठरवणार असल्याचा इशाराही पक्षाने दिला होता. त्यानुसार आता ही कारवाई सुरुू करण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

या फुटीर नगरसेवकांना कायदेशीर हिसका दाखवण्यासाठी भाजपने पुणे व मुबंई येथील तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेतला आहे. या सातही नगरसेवकांना सोमवारी अपात्रतेच्या नोटिसा बजावणार आहे. पक्षाचा व्हिप डालवून त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना का मतदान केले ? याप्रकरणी त्यांना नियमानुसार अपात्र का करू नये ? याबात नोटीस बजावली असून यावर सात दिवसात म्हणने सादर करण्यासाठी त्यांना मुदत देण्यात येणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

ही नोटीस शहर जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे व महापालिकेतील भजापचे गटनेते विनायक सिंहासने यांच्या सहीने बजावण्यात येणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here