मुंबईः ‘राष्ट्रीय एकात्मता हा काही एकट्या काँग्रेसचा मक्ता नाही. पंतप्रधानांच्या कृतीकडे राजकारण म्हणून नाही तर राष्ट्रीय एकात्मता म्हणून पाहायला हवं. मोदी काँग्रेसच्या मार्गावर चालले आहेत,’ असा टोला शिवसेनेचे नेते यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करोना प्रतिबंधक लस घेतली. पंतप्रधानांनी लस घेतल्यानंतर आगामी निवडणुकींच्या चर्चादेखील रंगल्या आहेत. तसंच, मोदींनी गळ्यामध्ये आसामी लोकांचा प्रतिक समजला जाणारा गमछा घातला होता. शिवाय, पंतप्रधानांना लस देणाऱ्या नर्सपैकी एक पुद्दच्चेरीची आहे तर दुसरी नर्स केरळची आहे. यावरुन संजय राऊत यांनी तिरकस भाष्य केलं आहे.

वाचाः

‘पंतप्रधानांच्या या कृतीकडे राष्ट्रीय एकात्मता म्हणून पाहा. मोदी काँग्रेसच्या मार्गावर चालले आहेत. पूर्वी काँग्रेसचे नेतेही अशाच भूमिका घेत होते. सगळ्या देशातील राज्यातील नेते आपल्या अवतीभोवती असतील याची काळजी घेत. निवडणुका आहेत हा तुमच्या डोक्यातील किडा आहे. त्यांच्या डोक्यात कदाचित ते नसेलही. ते फार सरळमार्गी नेते आहेत,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचाः

‘पंतप्रधानांनी करोना लस घेतली आहे. राष्ट्रपती घेतील, केंद्रीय मंत्रीदेखील घेतील. सर्व जनतेला लस मिळायली हवी. पंतप्रधानांनी लस घेतल्यानं जनतेचादेखील आत्मविश्वास वाढेल. त्यामुळं मोदींनी सर्वांसमोर येऊन लस घेत जो विश्वास दाखवलं त्याचं स्वागत करतो. आज आपल्या देशात पंतप्रधानांनी लस घेतली हे कौतुकास्पद आहे,’ असंही राऊत म्हणाले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here