वाचा:
विधानभवनाच्या आवारात ते माध्यमांशी बोलत होते. यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल विरोधी पक्षावर जोरदार टीका केली होती. त्याचा फडणवीस यांनी समाचार घेतला. ‘संजय राठोड यांच्या संदर्भातील प्रश्नांना उत्तरं देताना मुख्यमंत्र्यांची स्थिती केविलवाणी झाली होती. सगळे पुरावे असताना जणू काही घडलंच नाही, असं जेव्हा सांगावं लागतं, त्यावेळी नैतिक धैर्य साथ देत नाही. मास्क असतानाही चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत होतं,’ असा खोचक टोमणा फडणवीस यांनी हाणला. ‘यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये जे घडलं ते खरं की खोटं? क्लिप्स खऱ्या की खोट्या?, अशी विचारणा करतानाच, ‘तुम्हाला कोणाला साधू संत ठरवायचं असेल तर ठरवा, पण मग तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येतं,’ असंही फडणवीस म्हणाले.
मोहन डेलकर प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी!
खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या चौकशीच्या संदर्भातही फडणवीस यांनी भूमिका मांडली. ‘सुसाइड नोट मिळाल्यावर पोलीस चौकशी होतेच, ती व्हायलाच हवी. खरंतर डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये एकाही भाजप नेत्याचं नाव नाही. त्यामुळंच नावं जाहीर केली जात नाहीत,’ असा दावाही फडणवीस यांनी केला.
काँग्रेसची सायकल रॅली राज्य सरकारच्या विरोधात
‘काँग्रेसची सायकल रॅली हा निव्वळ फार्स होता. गुजरातसह इतर ९ राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल दहा रुपयांनी महाग आहे. राज्य सरकार पेट्रोलवर २७ रुपये कर लावते. याउलट केंद्र सरकारला पेट्रोलवरील करातून ३३ रुपये मिळतात. त्यातील ४ रुपये कृषी सेस आणि ४ रुपये डिलरचे कमिशन असते. उर्वरीत पैशातले ४२ टक्के पैसे राज्याला परत केले जातात,’ असं ते म्हणाले. ‘राज्य सरकारच्या करामुळंच इथं पेट्रोल महाग आहे. काँग्रेसचं आंदोलन राज्य सरकारच्या कराविरोधात असावं,’ असा चिमटाही त्यांनी काढला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times