वाचा:
मागील वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याचा मोठा फटका रुग्णालये, शेअर बाजार व अन्य सेवांना बसला होता. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. यामागे काही घातपाताचा संशय असावा, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळं ही शक्यता खरी ठरली आहे. त्या ‘पावर कट’मध्ये चीनचा हात होता. गलवान खोऱ्यातील संघर्षाची किनार या घातपातास होती, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
वाचा:
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्य सरकारनं त्याचवेळी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. तेव्हा मला वेड्यात काढण्यात आलं होतं. पण काहीतरी गडबड आहे ही शंका आम्हाला आली होती. त्यामुळं आम्ही तात्काळ ऊर्जा विभागाची चौकशी समिती स्थापन केली होती. राज्य वीज नियामक आयोग (MERC) व केंद्रीय वीज प्राधिकरणानंही समिती स्थापन केली होती. सायबर सेललाही तक्रार करण्यात आली होती. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज येणार आहे. गृहमंत्री आज तो अहवाल ऊर्जा विभागाला देणार असून त्याबाबत सविस्तर निवदेनही केलं जाईल’ असं राऊत यांनी सांगितलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times