जळगाव: जिल्ह्यात देखील आजपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोविन ॲपमध्ये नाव नोंदणीसाठी खासगी रुग्णालयाचे कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठांनी प्रयत्न केला असता, ॲप सुरूच झाले नाही. ॲप अपडेशनचे काम सुरू असल्याने आज पहिल्याच दिवशी जळगाव जिल्ह्यात ज्येष्ठांचे लसीकरण रखडले.

जळगाव शहरासह जिल्ह्यातील २८ खासगी रुग्णालयात आज ज्येष्ठांचे लसीकरण करण्यात येणार होते. यामुळे सकाळापासून खासगी रुग्णालयात अनेक ज्येष्ठ नागरिक नाव नोंदणी व लसीकरणासाठी गेले होते. मात्र, केंद्र शासनाच्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने त्यांची नाव नोंदणी होवू शकली नाही. अनेक ठिकाणी सर्व्हर सुरू नसल्याने लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले.

वाचा:

जिल्ह्यात २८ खासगी रुग्णालयात शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान जनआरोग्य योजना आदी योजनांद्वारे रुग्णांवर उपचार केले जातात. अशा रुग्णांलयांना करोना लसीकरण सेंटरचा दर्जा देण्यात आला आहे. ज्येष्ठांना या रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस देण्यात येणार होती. त्यासाठी ज्येष्ठांना १५० रुपये व्हॅक्सिन शुल्क व १०० रुपये सर्व्हिस चार्ज, असे एकूण २५० रुपये मोजावे लागणार आहेत.

लसीकरण बंद ठेवण्याचे आदेश

शहरातील ऑर्कीड हॉस्पीटल, गाजरे हॉस्पीटल, गोल्डसिटी हॉस्पीटल याठिकाणी करेाना लसीकरण सुरू होणार होते. ज्येष्ठांच्या नाव नोंदणीसाठी असलेल्या वेबसाइटच्या अपडेशनचे काम सूरू असल्याने शासनाने आज होणारे लसीकरण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ज्येष्ठांचे लसीकरण बंद असल्याची माहिती महापालिका रुग्णालयातील डॉ. पल्लवी पाटील यांनी दिली आहे.

खासगी रुग्णालयांना ड्राय रनची प्रतिक्षा

जास्त वय असणारे आणि आजारी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आजपासून कोरोना लसीकरण करण्यात येणार होते. मात्र, त्याबाबतच्या सूचना अजून शासनाकडून आलेल्या नाही. तसेच लसीकरणापूर्वी खासगी हॉस्पीटलमध्ये ‘ड्राय रन’अद्याप झालेला नाही . ड्राय रन घेतल्यानंतर खासगी माहीती प्रतिक्रिया जिल्हा रुग्णालयाचे प्रशासनाधिकारी डॉ. यू. बी. तासखेडकर दिली.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here