या प्रकरणात भाजपाची ‘चित मैं हारा, पट तू जिता,’ अशी दुटप्पी भूमिका समोर आली आहे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या निहालचंदचा राजीनामा मोदी यांनी का घेतला नाही?, तसेच गुजरातमध्ये एका महिलेच्या टेहळणीसंदर्भातील ऑडीओ टेपचे प्रकरण भाजपाने का दाबले? असे प्रश्न सावंत यांनी विचारले आहेत.
महिला अत्याचारावरील असंवेदनशीलता व बलात्काऱ्यांविषयीची भाजपाची आत्मियता अनेक प्रकरणात समोर आली आहे. यातून भाजपाचा दुट्टपीपणा, दांभिकता आणि दुहेरी मापदंड उघडे पडलेले आहेत, असे सावंत यांनी म्हटले आहे. सन २०१४ साली बलात्काराचा आरोप असलेल्या निहालचंद यांना मंत्रिमंडळात का घेतले गेले आणि आरोप झाल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी त्यांचा राजीनामा का घेतला नाही ? याचे उत्तर भाजपाने द्यावे, असे आव्हान सावंत यांनी भाजपला केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
संजय राठोड प्रकरणी ऑडीओ टेपवरून बोंब ठोकणाऱ्या भाजपा नेत्यांनी गुजरातमधील एका महिलेची पोलिसांनी केलेल्या टेहळणी प्रकरणातील ऑडिओ टेप का दाबण्यात आली? असा प्रश्न सावंत यांनी विचारला आहे. या प्रकरणात एका मंत्र्यांच्या आदेशाने गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने, ती महिला कुठे जाते? काय करते? याची टेहळणी केली होती. त्या प्रसंगातील ऑडिओ टेपमध्ये पोलीस आणि एका मंत्र्यांचे संभाषण समोर आले होते. त्या संभाषणातदेखील महिला, पोलीस, मंत्री याबरोबरच एक ‘साहेब’ देखील सहभागी असल्याचे दिसून आले होते. ते ‘साहेब’ कोण? हे अजूनही गुलदस्त्यातच राहिले आहे, असे सावंत म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
या ऑडिओ टेपच्या चौकशीची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र ती महिला किंवा तिच्या आईवडिलांपैकी कोणीही तक्रार केली नाही, असे उत्तर गुजरात सरकारने दिले होते. त्यावेळी त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला नाही आणि ती महिला आणि तिचे आईवडील दबावात नसतील का? या प्रश्नाचे उत्तरही दिले गेले नाही. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे धारिष्ट्य भाजपा दाखवील का? असा प्रश्नही सावंत यांनी विचारला.
क्लिक करा आणि वाचा-
भाजपच्या नेत्यांनी बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे हे कथुआ, उन्नाव, हाथरस बलात्कार प्रकरणात देशाने पाहिले आहे. बलात्कार प्रकरणी जेलमध्ये गेलेल्या भाजपा आमदार कुलदिपसिंग सेनगरला भेटायला साक्षी महाराज गेले होते. त्या पीडित महिलेला मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न करावा लागला आहे. तिच्या वडिलांना ठार मारले गेले आहे. चिन्मयानंदच्या प्रकरणी पीडित मुलीलाच अटक करण्यात आली. हे पाहता भाजपला महिला अत्याचारांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times