करोनाच्या चाचणीचा अहवाल (Corona test report) देण्यासाठी दौंड येथील शासकीय रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला १५०० रूपयांची स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने () अटक केली आहे. ( for to give )
मिलिंद दामोदर कांबळे (वय ३८) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौड शासकीय रुग्णालयात कांबळे हे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत ते काम करतात. या रुग्णालयात करोनाची टेस्ट केली जाते. तक्रारदार व त्यांच्या १९ कामगारांनी शासकीय रुग्णालय दौड २६ फेब्रुवारी रोजी केस पेपर काढून कोविड १९ रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेल्या आहेत. त्याचा अहवाल देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी प्रत्येकी १०० रुपये असे एकूण एक हजार ९०० रुपये लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली होती.
क्लिक करा आणि वाचा-
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्या पडताळणी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तडजोडीअंती दीड हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने कांबळे यांना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षण सुनील बिले हे अधिक तपास करत आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times