वाचा:
राज्यात करोनाचा धोका वाढत चालला आहे. गेले काही दिवस सातत्याने रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने चिंता वाढत चालली आहे. रुग्णवाढीला ब्रेक लावण्यासाठी सर्वच जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक पावले टाकण्यात येत आहेत. विदर्भातील , नागपूरसह काही जिल्ह्यांत करोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून विदर्भात स्थितीनुसार जमावबंदी, संचारबंदी आणि लॉकडाऊनसारखी पावले उचलण्यात आली आहेत. , , ठाणे, सातारा या भागांतही करोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय असून स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्यात आजची आकडेवारी काहीसा दिलासा देणारी ठरली आहे.
वाचा:
आज एकीकडे नवीन बाधितांचा आकडा घटला आहे तर दुसरीकडे करोनामुक्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. आजचा मृतांचा आकडाही कालच्या तुलनेत निम्म्याने कमी झाला आहे. रविवारी राज्यात ६२ करोना बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली होती तर आज हा आकडा ३० पर्यंत खाली आला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५२ हजार १८४ जणांचा करोनाने मृत्यू झाला असून सध्या करोना मृत्यूदर २.४१ टक्के इतका आहे.
राज्यात आज ६ हजार ३९७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ७७ हजार ६१८ इतकी झाली आहे. यात सर्वाधिक १५ हजार १९९ इतके अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात असून पुण्यासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. पुणे जिल्ह्यानंतर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून आता १० हजार १६७ इतकी झाली आहे. मुंबई पालिका हद्दीत ही संख्या ८ हजार २९४ इतकी असून ठाणे जिल्ह्यात सध्या ८ हजार ७३ रुग्ण उपचार घेत आहेत. करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अमरावती जिल्ह्यात हा आकडा सध्या ६ हजार ४९७ इतका आहे.
वाचा:
राज्यात आज ५ हजार ७५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण २० लाख ३० हजार ४५८ करोना बाधित रुग्णांनी करोनाला मात दिली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९३.९४ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६३ लाख ४६ हजार ३५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ६१ हजार ४६७ (१३.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ४३ हजार ९४७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ३ हजार ४८२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times