मुंबई: गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईत झालेल्या ‘पॉवर कट’मागे (Power Cut In Mumbai) चीनचा हात असावा असा अंदाज अमेरिकेतील एका कंपनीने व्यक्त केला असून मुबईतील इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये परदेशी कंपनीने व्हायरस सोडण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावे आमच्याकडे तपासाअंती उपलब्ध झाले आहेत. मात्र, यामध्ये चीनचा हातआहे का?, याबाबत तपास करण्यात येईल असे, राज्याचे गृहमंत्री (Anil Deshmukh) यांनी म्हटले आहे. (we will investigate whether is behind the says )

अमेरिकेतील रेकॉर्डेड फ्यूचर अॅलालिसीस कंपनीने मुंबईतील ‘पॉवर कट’चा अभ्यास केला आहे. या कंपनीने केलेल्या विश्लेषणात या मागे चीनचा हात असू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. तशा बातम्या आज अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉलस्ट्रीट जर्नल या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रातही छापून आलेल्या आहेत. मुंबई सायबर क्राइम आणि वीज विभागाने केलेल्या तपासात मुंबईच्या इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये परदेशी कंपनीने व्हायरस सोडण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

महाराष्ट्र साबर क्राइमने सुपरवायझरी कंट्रोल डाटा ट्रान्समिशन सिस्टमबाबत विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी यात व्हायरस घुसवण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो, अशी शक्यता वर्तवली असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.

सायबर क्राइमच्या तपासात आढळून आलेल्या गोष्टी
सायबर क्राइमने केलेल्या तपासात प्रामुख्याने तीन गोष्टी आढळून आल्या असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. यात तपासात १४ ट्रोजन हॉर्सेस या सर्व्हिसमध्ये टाकण्यात आल्याचा पुरावा मिळाल आहे. तसेच ८ जीबी डाटा हा परदेशी कंपनीने एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये ट्रान्सफर केलेला असून शकतो, असे सायबर क्राइमने म्हटले आहे. तसेच काळ्यायादीतील इंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेसच्या (IPA) माध्यमातून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये लॉगीन करण्याचा प्रयत्न झालेला असावा असेही सायबर क्राइमच्या अहवालात म्हटले आहे.

याबाबतचा सविस्तर अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऊर्जा मंत्री नितीन देशमुख यांच्याकडे सोपवला असून त्या अहवालानुसार पुढील तपास करण्यात येणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

‘अहवालाचा अभ्यास करून पुढील कारवाई करणार’

या प्रकरणासंबंधी केंद्र सरकार, एमईआरसी आणि राज्य सरकारचे तीन्ही अहवाल माझ्याकडे आले आहेत. आता या अहवालाचा अभ्यास करून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने याबाबत अधिक तपशीलवार माहिती देता येणार नाही, असेही राऊत म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याचा मोठा फटका मुंबईतील रुग्णालये, शेअर बाजार आणि इतर महत्वाच्या सेवांना बसला होता. अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर हा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. यामागे काही घातपात असावा असा संशय व्यक्त करण्यात आला होता. खुद्द ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील हा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी याबाबत तपास करण्याची विनंती गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली होती.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here