प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आल्या दिवसाला हिंदूनिष्ठेचे ढोल बडवत असतात. मात्र त्यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास आहे असे दिसत नाही. म्हणूनच त्यांनी ख्रिश्चन नर्सकडून लस टोचून घेतली. हे काय वर्तन आहे.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पी. निवेदा आणि रोसामा अनिल या एम्सच्या परिचारिकांनी करोनाची लस टोचली. परिचारिका पी. निवेदा या मूळच्या पुद्दुचेरीच्या आहेत, तर परिचारिका रोसामा अनिल या केरळच्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ही लस दिली आहे. आता त्यांना पुढचा डोस आम्ही २८ दिवसांनंतर देणार आहोत, अशी माहिती निवेदा यांनी दिली आहे. मी एम्समध्ये गेल्या वर्षभरापासून काम करत आहे. पंतप्रधान येणार असल्याची माहिती आम्हाला सकाळीच मिळाली. त्यानंतर पंतप्रधानांना लस देण्यासाठी मला बोलावण्यात आले. तेव्हा आम्हाला पंतप्रधान लस घेण्यासाठी आले असल्याचे समजले, असे निवेदा यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times