नागपूर: घुग्घुसवरून सोलापूरकडे निघालेली मालगाडी जवळील कायर रेल्वे स्थानकानजीक घसरल्याने कोळशाच्या तब्बल १३ वॅगन रुळाखाली आल्या. सोमवारी सायंकाळी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रेल्वे मार्गावर सर्वत्र पसरला. तसेच ओएचई तारही तुटले. ( near in )

मालगाडीला ५५ च्यावर वॅगन असतात. कोळशाची वाहतूक होत असल्याने या मालगाडीलाही ५५ पेक्षा अधिक वॅगन असाव्या. घुग्घुसवरून निघालेली मालगाडी सोलापूर विभागात जात असताना हा अपघात घडला. यात काही वॅगन रुळापासून दूर फेकल्या गेल्या व रूळही वाकले. त्यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येते.

या घटनेची माहिती लोकोपायलट,सहायक लोकोपालयट आणि गार्डकडून विभागाला मिळाली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांनी तातडीने मदत पथक रवाना केले. अजनी रेल्वे स्थानकावरून १४० टन वजनी क्रेन घटनास्थळी रवाना करण्यात आली. तसेच पूर्णा रेल्वे स्थानक जवळ असल्याने तेथूनही १४० टन वजनी क्रेन पाठविण्यात आली. त्याच प्रमाणे नागपूर आणि वर्धा स्थानकावरून एक्सिडेंट रिलिफ ट्रेन घटनास्थळी गेली. रात्री ८ वाजेपासून मदत कार्याला सुरूवात झाली. मदत कार्य रात्रभर सुरू होते.

क्लिक करा आणि वाचा-

या मार्गावर प्रवासी गाडी नसल्याने दुखापत होण्याचा प्रश्न नाही. अन्य गाडीच्या वेळेवर परिणाम झाला नाही. युध्दपातळीवर मदतीचे काम सुरू आहे. असे मध्य रेल्वेचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस.जी. राव यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here