ज्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्या भाजप नेत्यांमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे आमदार अतुल भातखळकर, उपाध्यक्षा चित्रा वाघ, आशीष शेलार आणि प्रसाद लाड यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपच्या या नेत्यांनी पूजा चव्हाण हिचे चारित्र्यहनन केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
तक्रारीत आणखी काय म्हटले आहे?
या प्रकरणात पूजा चव्हाण हिची तर बदनामी झालेली आहेच, पण तिच्याबरोबरच तिचे कुटुंब आणि संपूर्ण बंजारा समाजाची देखील बदनामी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली किंवा कसे याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र पोलिस तपास सुरू असताना देखील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी थेट पोलिस ठाण्यामध्ये जात पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे काम केले. याद्वारे त्यांनी तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, असेही तक्रारीत म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
इतकेच नाही, तर भाजपच्या नेत्यांनी कोर्टाच्याही निर्णयाची पायमल्ली करत संपूर्ण देशात एका स्त्रीची बदनामी केली. अशा प्रकारे बदनामी करणाऱ्या भाजप नेत्यांवर आणि प्रसार माध्यमांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही या तक्रारीत करण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times