सामाजिक न्याय विभागाने घतलेल्या या निर्णयानुसार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या लाभात काही भरीव बदल करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांना पूर्वी प्रतिमहिना ११० रुपये शिष्यवृत्ती मिळत असे. त्यात दुपटीने वाढ करत ती आता दरमहिना २२५ रुपये इतकी करण्यात आली आहे.
तसेच इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना महिना ११० रुपये मिळत होते. आता या निर्णयानुसार त्यात वाढ होऊन ती रक्कम २२५ रुपये झाली आहे. तर वर्षाला मिळणारे एकत्रीत मानधन हे पूर्वीप्रमाणे रुपये ७५० इतकेच असणार आहे. विद्यार्थ्यांना पूर्वी वर्षाला १८६० रुपये मिळत असत. आता नवीन नियमानुसार झालेल्या वाढीनंतर वर्षाला एकूण ३००० रुपये मिळणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
वसतीगृहात राहणाऱ्या इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ७०० रुपये आणि वार्षिक अनुदान १००० रुपये इतकी शिष्यवृत्ती पूर्ववत नियमाप्रमाणेच सुरू राहील असेही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील सफाईच्या क्षेत्रात आणि आरोग्याला धोकादायक समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या पाल्यांना या निर्णयामुळे दामदुप्पट लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जात/धर्म याचे बंधन असणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times