मुंबई: भटक्या विमुक्त समाजाचे नेते आणि मराठी साहित्यात या आत्मचरित्राने गाजलेले लेखक यांना राज्य सरकारने पुरस्काराने सन्मानित केलेले असून, गायकवाड यांच्या ताब्यातील गोरेगावच्या चित्रनगरीतील उपहारगृहाच्या जागेसंदर्भात नियमांनुसार निर्णय घ्यावा. तसेच त्यांच्या उपहारगृहातील वीज आणि पाणी पुरवठा तात्काळ सुरु करावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ( )

वाचा:

उपहारगृह सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आश्वस्त केले आहे. डॉ. गोऱ्हे यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करत व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा यांनी तात्काळ वीज व पाणी पुरवठा सुरळीत केला आहे. गायकवाड यांनी यावर समाधान व्यक्त केले असून सपत्नीक सुरू असलेले उपोषण त्यांनी मागे घेतले आहे. गायकवाड यांनी डॉ. गोऱ्हे यांचे विशेष आभार मानले आहेत. उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांच्या ताब्यात असलेल्या चित्रनगरीतील जागेसंदर्भात बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे विधानभवनात झाली. यावेळी चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनिषा वर्मा, साहित्यिक अर्जुन डांगळे, सक्षम अधिकारी तेजस समेळ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वाचा:

१९९५ पासून शासनाने गायकवाड यांच्या सन्मानार्थ चित्रनगरीत उपहारगृहासाठी जागा दिली होती. यासंदर्भात २०१७ च्या करारानुसार भाडे देण्यास तयार असून सध्या दीड लाख भाडे देत आहे. सध्या उपहारगृह बंद असल्याने कामगार उपाशी आहेत. २०१७ चा करार मान्य असून नियमानुसार वीजपुरवठा व पाणीपुरवठा सुरू करून शासनाने उपहारगृह सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे गायकवाड यांनी बैठकीत सांगितले. भाडे थकबाकीबाबत नोटिसा देऊनसुद्धा नियमांची पूर्तता न केल्याने उपहारगृह बंद करून वीजपुरवठा-पाणीपुरवठा खंडीत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा:

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, या जागेबाबत कायदेशीर, योग्य निर्णय घेऊन एका साहित्यिकाचे सनदशीर मार्गाने पुनर्वसन करण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत. गायकवाड यांनी शिवभोजन थाळी सुरू करण्याबाबत व पॉवर ऑफ अटर्नी रद्द करण्याबाबत मान्यता देऊन वीज-पाणीपुरवठा सुरु केल्यास उपोषण थांबविण्याचे मान्य केले. त्यानुसार लक्ष्मण गायकवाड यांनी उपोषण मागे घेतले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here