सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी संसदीय अंदाज समिती जिल्ह्यात दाखल झाली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष खासदार , , खासदार , जुगल किशोर शर्मा, सुदर्शन भगत यांचा समावेश आहे. ( )

वाचा:

सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असताना या विमानतळाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारकडून आवश्यक कामांची पूर्तता केली जात होती. परंतु, या विमानतळाच्या अन्य कामांसोबतच धावपट्टीची दुरुस्तीदेखील बाकी आहे, असे नमूद करत डीजीसीआयने विमानतळावरून विमान उड्डाण करायला परवानगी दिली नव्हती. आता मात्र विमानसेवा कायमस्वरूपी सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय अंदाज समितीने सोमवारी या विमानतळाची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच आयआरबीचे अधिकारी आणि विमानतळ व्यवस्थापनाशी चर्चा केली. ही समिती आपला अहवाल आता भारत सरकारला सादर करणार आहे.

वाचा:

चिपी विमानतळाची पाहणी केल्यानंतर राजीव प्रताप रूडी यांनी चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला. विमानसेवा सुरू झाल्यानंतर देशाची पर्यटन राजधानी होईल, असा दावाही त्यांनी मीडियाशी बोलताना केला. चिपी विमानतळावरून विमान उड्डाण करण्यासाठी अलायन्स एअरलाइन ही कंपनी पुढे आली आहे. या कंपनीचे तिकीट काऊंटरचे काम देखील विमानतळावर पूर्ण होत आले आहे. अन्य काही कंपन्या या विमानतळावरून हवाई वाहतूक करायला इच्छूक असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.

चिपी विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी विनायक राऊत यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज ही संसदीय समिती जिल्ह्यात दाखल झाली आहे. या समितीला मिनी पार्लमेंटचा अधिकार आहे. त्यामुळे विमानतळ लवकरच सुरू होईल, असे यावेळी जम्मू काश्मीरचे भाजपा खासदार जुगल किशोर शर्मा म्हणाले.

वाचा:

सिंधुदुर्गच्या विकासासाठी विनायक राऊत सातत्याने संसदेत आवाज उठवत असतात. आज निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग पाहिल्यावर सिंधुदुर्गबद्दल असलेली त्यांची तळमळ योग्यच असल्याचे दिसून आले, असे सांगताना यापुढील काळात आमचीही ताकद विनायक राऊत यांच्या मागे उभी केली जाईल, असे विधान किल्ले सिंधुदुर्गमध्ये बोलताना शर्मा यांनी केले. गिरीश बापट, विनायक राऊत, जुगल किशोर शर्मा, सुदर्शन भगत यांनी मालवण येथे किल्ले सिंधुदुर्गलाही भेट दिली. यावेळी शिवराजेश्वर मंदिरात जात छत्रपती शिवाजी महाराजांचे या सर्वांनी दर्शन घेतले.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here