नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात ( ) शेतकऱ्यांचे आंदोलन ( ) सुरूच आहे. आता भारतीय किसान युनियनचे नेते ( ) यांनी सरकार संशय व्यक्त केला आहे. शेतकरी आंदोलनाविरोधात केंद्र सरकार काहीतरी खिचडी शिजवत आहे. आंदोलनाविरोधात काहीतरी होणार यांचे संकेत सरकारच्या मौनातून येत आहेत. गेल्या १५-२० दिवसांपासून सरकार गप्प आहे. सरकार कुठल्या ना कुठल्या तरी तयारी आहे, असं राकेश टिकैत म्हणाले.

‘शेतकरी आंदोलनही करणार आणि शेतीही’

केंद्राचे नवीन लागू होत नाही तोपर्यंत दिल्लीतून मागे हटणार आहे. आंदोलन कधी संपवायचं या निर्णय आता केंद्र सरकारने घ्यायचा आहे. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यास शेतकरी आपल्या गावी परततील. असं झालं नाही तर शेतकरी शेतीही बघितल आणि आंदोलनही करतील, असा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी केला.

शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये आतापर्यंत चर्चेच्या १२ फेऱ्या झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही चर्चेतूनच शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा निघेल असं म्हटलं आहे. पण अद्यापर्यंत केंद्र सरकारने चर्चेचा कुठलाही प्रस्ताव शेतकरी संघटनांना मिळालेला नाही. पण सरकारने बोलावल्यास आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असं राकेश टिकैत यांनी सांगितलं.

‘२४ मार्चपर्यंत देशभर शेतकरी सभा’

सरकारने मागण्या मान्य न केल्यास शेतकरी आपली पिकं पेटवून देतील, असं राकेश टिकैत म्हणाले होते. त्यावर त्यांना प्रश्न केला गेला. अद्याप ती वेळ आली नाही. पण शेतकऱ्यांनी आपलं पिकं नष्ट करू नये, असं आवाहन सरकारनेही करायला हवं आहे. शेतकरी सभा २४ मार्चपर्यंत सुरू राहतील, असं राकेश टिकैत यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here