नवी दिल्लीः पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्यानंतर आता CNG आणि CNG-PNGच्या किंमतीही वाढत ( ) आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (igl) ने सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. २ मार्च म्हणजे उद्या सकाळी ६ वाजल्यापासून दिल्लीत सीएनजीची दरवाढ लागू होईल. सीएनजी ४३.४० रुपये प्रति किलो आणि पीएनजी २८.४१ रुपये प्रति क्यूबिक मीटरपर्यंत वाढेल. या किंमतींमध्ये मूल्यवर्धित कराचा (vat) समावेश आहे.

सीएनजी आणि पीएनजीच्या वाढलेल्या किंमती दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, कानपूर, फतेहपूर, हमीरपूर, मुझफ्फरनगर, शामली, करनाल, कैथल आणि रेवाडी येथे लागू होतील, असं कंपनीने निवेदनात म्हटलं आहे. या शहरांमध्ये सीएनजीच्या किंमतीत किलोमागे ७० पैशांची वाढ होणार आहे. दर वाढीमागील कारण म्हणजे कोविड १९ या कालावधीत इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडची निश्चित किंमत, मनुष्यबळावरील खर्च आणि ऑपरेटिंग कॉस्टमध्ये झालेली वाढ, असल्याचं सांगण्यात आलं आहे.

CNG चे नवीन दर

> दिल्ली- ४३.३० रुपये प्रति किलो
> नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद- ४९.०८ रुपये प्रति किलो
> कानपूर, हमीरपूर, फतेहपूर – ६०.५० रुपये प्रति किलो
> रेवाडी- ५४.१० रुपये प्रति किलो
> करनाल, कैथल- ५१.३८ रुपये प्रति किलो

PNG चे नवीन दर

> दिल्ली- २८.४१ रुपये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर
> नोएड, ग्रेटरर नोएडा, गाझियाबाद- २८.३६ रुपये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर
> रेवाडी, करनाल- २८.४६ रुपये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर
> मुजफ्फरनगर, शामली, मेरठ- ३२.६७ रुपये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर

सवलत आणि कॅशबॅक उपलब्ध

आयजीएल कनेक्ट मोबाइल अॅपद्वारे घरगुती पीएनजी ग्राहकांनी सेल्फ बिलिंग पर्यायाचा उपयोग केल्यास १५ रुपये सूट मिळेल. सीएनजी रिफ्युलिंग आणि कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी गर्दी नसलेल्या वेळेत आयजीएलने आपली विशेष कॅशबॅक योजना सुरूच ठेवली आहे. या योजनेंतर्गत आयजीएल सीएनजी स्थानकांवर आयजीएल स्मार्ट कार्डद्वारे सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत आणि दुपारी १२ ते सायंकाळी सकाळी ६ वेळेत सीएनजी रिफिल केल्यास ०.५० रुपये प्रतिकिलोनुसार कॅशबॅक दिला जातोय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here