वाचा:
पुणे शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. महापालिका क्षेत्रात अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले होते. त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट, बार, पब यांना रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. शहरातील करोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम असल्याने हे निर्बंध १४ मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहेत.
वाचा:
विनामास्क फिरणाऱ्या ८५३ नागरिकांवर कारवाई
पुणे शहरात विना फिरणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू आहे. रविवारी दिवसभरात पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या ८५३ नागरिकांवर कारवाई करत चार लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. करोना संसर्गाचा वाढता धोका पाहता प्रशासन अॅलर्ट झाले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वाचा:
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. सध्या राज्यात करोनाचे सर्वाधिक १५ हजार १९९ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यात पुणे पालिका हद्दीत रुग्णवाढ अधिक आहे. पुणे शहरात गेल्या २४ तासांत ४२७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊनच पालिका प्रशासन प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत असताना त्याला पोलीसही साथ देत आहेत. त्याचाच भाग म्हणून शहरात रात्रीची संचारबंदी वाढवण्यात आली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times