मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वैधानिक विकास महामंडळांच्या घोषणेवरून चांगलीच जुंपली. राज्यपालांनी १२ सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच, वैधानिक विकास महामंडळांची स्थापना करू, असं उपमुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावरून सभागृहात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. माजी खासदार यांनी याच मुद्द्यावरून अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

नीलेश राणे यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘१२ आमदार जाहीर होतील तेव्हा वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना करू असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा, विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा, विदर्भात आले तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केलं पाहिजे,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. ‘विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्तीचा आणि वैधानिक विकास महामंडळाचा काय संबंध?,’ असा सवालही राणे यांनी केला आहे.

काल नेमकं काय घडलं होतं?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिल्या दिवसाचं कामकाज सुरू होताच, भाजप नेते यांनी मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळांच्या स्थापनेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. ७२ दिवस उलटून गेले, तरी राज्य सरकार वैधानिक विकास महामंडळांची पुनर्स्थापना का करीत नाही? राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोकही राहतात हे सरकारनं लक्षात ठेवलं पाहिजं, असं ते म्हणाले होते. त्यांना उत्तर देताना पवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत. अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील, त्या दिवशी वैधानिक विकास महामंडळं जाहीर करू, असं ते म्हणाले होते.

विरोधी पक्षनेते यांनी त्यास जोरदार आक्षेप घेतला होता. ‘अजितदादा जे तुमच्या पोटात होते ते ओठावर आले. १२ सदस्यांसाठी विदर्भ आणि मराठवाड्याला ओलीस धरणे योग्य नाही. मराठवाड्यातील लोक हे कदापिही सहन करणार नाहीत. राज्यपाल आणि तुमचे जे काही सुरू आहे. त्याच्याशी या सभागृहाला काहीही घेणे देणे नाही. हा आमचा हक्क आहे. आम्ही भीक मागत नाही. आम्ही भिकारी नाही. जे आमच्या हक्काचे आहे, आम्ही ते मिळवूच,’ असा इशाराही फडणवीसांनी सरकारला दिला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here