कराची: शारजाहून लखनऊला जाणाऱ्या एका भारतीयाचा विमान प्रवासात मृत्यू झाला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये विमानाची एमर्जन्सी लँडिंग करावी लागली. इंडिगो एअरलाइन्सचे हे विमान होते. या विमानातील प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगो एअरलाइन्सच्या ६ई१४१२ या विमानाला कराची विमानतळावर आपात्कालीन लँडिंग करावी लागली. विमानातील प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर विमानाच्या पायलटने आपात्कालीन लँडिंगसाठी कराची विमानतळाकडे परवानगी मागितली होती. विमान कराचीमध्ये उतरण्याआधीच प्रवाशाचा मृत्यू झाला होता.

वाचा:
इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, शारजाहून लखनऊसाठी उड्डाण घेतलेल्या विमानात वैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे विमान कराचीकडे वळवावे लागले. दुर्दैवाने या प्रवाशाचे वाचवता आले नाही. विमानतळावर वैद्यकीय पथकाने या प्रवाशाला मृत घोषित करण्यात आले. हे विमान अहमदाबाद मार्गे लखनऊला जाणार होते.

वाचा:

याआधी, मागील वर्षी रियाधहून दिल्लीला जाणाऱ्या गो-एअर विमानाला वैद्यकीय आपात्कालीन परिस्थितीमुळे कराची विमानतळावर लँडिंग करावे लागले होते. त्यावेळीही विमानातील प्रवाशाला कार्डिक अरेस्ट आला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मानवतेच्या भावनेतून विमानाला एमर्जन्सी लँडिंग करण्याची परवानगी दिली. भारतीय प्रवासी विमानात बेशुद्ध झाला होता. त्यानंतर विमानाचे लँडिंग झाल्यानंतर विमानतळावरील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here